August 12, 2025 1:29 PM August 12, 2025 1:29 PM

views 14

लोकसभेतलं कामकाज…

लोकसभेच्या सभागृहाचं कामकाज आज सुरु झाल्यावर विरोधकांनी बिहार मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली होती. प्रश्नोत्तरांच्या तासात विरोधकांच्या घोषणा सुरु झाल्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी प्रथम दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी ३ वाजेपर्यंत सभागृह तहकूब केलं.    गोंधळ सुरु असतानाच ग्रामीण विकास राज्यमंत्री चंद्रशेखर पेमसेनी यांनी ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’ अंतर्गत सुरु असलेल्या घरांच्या बांधकामाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर दिलं.  केंद्र सरकारने या योजने...

July 20, 2025 7:47 PM July 20, 2025 7:47 PM

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात

संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून ते २१ ऑगस्टपर्यंत चालेल.  अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवी दिल्लीत संसद भवन इथं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.    ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत बोलण्यासाठी सरकार तयार असून भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याबाबतही सरकार सभागृहात योग्य उत्तर देईल, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.    सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या भूमिका ...

July 18, 2025 8:01 PM July 18, 2025 8:01 PM

views 15

‘जनसुरक्षा विधेयक’ हे लोकशाही पद्धतीनं तयार केलं गेलं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही पद्धतीने, विरोधी पक्षांच्या सदस्यांचं म्हणणं ऐकून घेऊन तयार केलं गेलं, याबाबतच्या समितीतल्या कुणीही असहमती दर्शवली नाही, मात्र विरोधकांनी नंतर दबाव आल्यामुळे सभागृहात वेगळी भूमिका घेतली, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पावसाळी अधिवेशनानंतर वार्ताहरांशी बोलताना केला.   जनसुरक्षा कायद्यात कसलीही स्पष्टता नसल्यानं त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या कायद्याला विरोध असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या विधेयकाच्या विर...

July 18, 2025 7:04 PM July 18, 2025 7:04 PM

views 151

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपुरात

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं. विधिमंडळाचं यापुढचं, हिवाळी अधिवेशन नागपुरात ८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे.    या अधिवेशनात विधानसभेच्या एकूण १५ बैठका झाल्या यात १३३ तास ४८ मिनिटं कामकाज झालं. अधिवेशन काळात १४ विधेयकं पुनर्स्थापित झाली, तर १५ विधेयकं संमत झाली. एक विधेयक मागं घेण्यात आलं. अधिवेशनात विधानसभा सदस्यांची उपस्थिती ८२ दशांश २३ टक्के इतकी राहिली.   विधानपरिषदेच्या १५ बैठका झाल्या, त्यात एकंदर १०५ तास, म्हणजे दररोज सरासरी ७ तास चर्चा झाल्याचा माहिती ...

July 18, 2025 7:22 PM July 18, 2025 7:22 PM

views 5

अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळाला नसल्याची उद्धव ठाकरेंची टीका

मुख्यमंत्र्यांचं भाषण ही स्वप्नरंजन गुटिका होती, या अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळाला नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनाच्या आवारात बातमीदारांशी बोलताना केली. लोकांच्या प्रश्नांना उत्तर मिळालं की नाही, त्यावर उपाययोजना केल्या की नाही, याचं उत्तर या अधिवेशनातून मिळालं नाही, असं ते म्हणाले.   सत्ताधाऱ्यांना त्यांच्या चुका दाखवल्या तर ते आधीच्या सरकारकडे बोट दाखवतात, मात्र सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असंही ते म्हणाले. जनसुरक्षा कायद्यात कसलीही स्पष्टता नसल्यान...

July 4, 2025 6:29 PM July 4, 2025 6:29 PM

views 13

राज्यातल्या शेतकऱ्यांना सरकारच्या अंमलबजावणीतल्या दुर्लक्षामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे-अंबादास दानवे

राज्य सरकारने शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात ३ लाख ३१ हजार अर्ज सरकारकडे पडून आहेत, असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज नियम २६० अन्वये मांडलेल्या ठरावादरम्यान केला. राज्यातल्या एकूण २ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी सौर पंपासाठीचा त्यांचा हिस्सा सुद्धा भरलेला आहे. याद्वारे, सरकारकडे ९४४ कोटी रुपये इतकी रक्कम जमा असूनही त्यांना सौर पंप मिळायला आणखी बराच अवधी वाट पाहावी लागणार आहे, असंही दानवे यावेळी म्हणाले.    राज्यातल्या शेतकऱ्यांना नैसर्...

July 19, 2024 1:44 PM July 19, 2024 1:44 PM

views 22

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार सहा नवीन विधेयकं सादर करणार

पुढच्या आठवड्यात सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार नवीन सहा विधेयकं सादर करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये काही सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकासह अर्थविषयक विधेयकांचा यामध्ये समावेश आहे. विमान कायदा १९३४ ला पर्याय म्हणून वायुयान विधेयक २०२४ मांडण्यात येणार असून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी त्यात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. लोकसभा सचिवालयानं काल या आगामी विधेयकांची सूची जाहीर केली.     येत्या २२ जुलै रोजी संसदेचं अधिवेशन सु...

June 27, 2024 1:36 PM June 27, 2024 1:36 PM

views 12

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु

  महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. सभागृहात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहासमोरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.   सभागृहाच्या कामकाजापूर्वी विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. शेतकऱ्यांची ...