May 13, 2025 3:17 PM May 13, 2025 3:17 PM
14
नैर्ऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्रात दाखल
नैर्ऋत्य मोसमी पावसाने बंगालच्या उपसागरातला दक्षिण भाग व्यापला असून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि उत्तर अंदमान सुद्राच्या काही भागात तो पोहोचला आहे. पुढच्या ३-४ दिवसात मान्सून आणखी पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकणात उद्या सकाळपर्यंत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा तसंच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पुढचे तीन दिवस तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा तसंच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस...