October 10, 2025 3:46 PM
36
नैऋत्य मौसमी पावसाचा राज्यातून माघारीचा प्रवास
नैऋत्य मौसमी पावसाचा राज्यातून माघारीचा प्रवास आजपासून सुरू झाला. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर आणि मध्य महाराष्ट्र, मुंबई, ठाणे यासारख्या परिसरातून मान्सूननं माघार घेतली आहे. येत्या काही दिवसात राज्याच्या इतर भागातूनही मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.