October 19, 2024 12:57 PM October 19, 2024 12:57 PM

views 8

युगांडा देशामध्ये मंकीपॉक्स च्या ४९ नव्या रुग्णांची नोंद

युगांडा देशामध्ये मंकीपॉक्स या आजारानं बाधित ४९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून त्यामुळे या संसर्गानं बाधित रुग्णांची एकूण संख्या आता १४५ वर पोहोचली असल्याचं, युगांडाच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. राजधानी कंपाला मध्ये  सर्वाधिक अर्थात २७ रुग्ण असून आत्तापर्यंत या आजारानं एकाही मृत्यूची  नोंद झाली नसल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. युगांडातल्या १९ जिल्ह्यांमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रभाव असून गेल्या आठवड्यात यात मोठी वाढ झाल्याचं आढळलं आहे.  युगांडा मध्ये मंकीपॉक्स आजाराचा संसर्...

September 28, 2024 11:29 AM September 28, 2024 11:29 AM

views 7

अफ्रिकेत मंकीपॉक्स आजाराचे ३२ हजार ४०० रुग्ण

अफ्रिकेत यावर्षीच्या सुरुवातीपासून मंकीपॉक्स या आजाराचे 32 हजार 400 रुग्ण आढळून आल्याची माहिती अफ्रिकेतील रोगनियंत्रण आणि प्रतिबंध विभागाच्या अफ्रिका केंद्रानं काल दिली. यामध्ये 6 हजार चारशेपेक्षा अधिक रुग्णांना लागण झाल्याची खात्री झाली असून 840 नागरिकांचा मंकापॉक्सनं मृत्यू झाला आहे अशी माहिती या विभागानं दिली आहे. अनेक देशांमध्ये या आजाराचा फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवरव काल दुरस्थ पध्दतीनं आढावा घेण्यात आला. त्यावेळी अफ्रिकेचे आरोग्य विभागातील डिरेक्टर जनरल जीन कसेया यांनी ही माहिती दिली. &...

September 18, 2024 7:51 PM September 18, 2024 7:51 PM

views 11

केरळमध्ये एका रुग्णाला मंकीपॉक्स विषाणूची लागण

केरळमध्ये मलप्पुरम जिल्ह्यातल्या मंजेरी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला मंकीपॉक्स विषाणूची लागण झाली आहे. हा रुग्ण दुबईहून आल्यानंतर चाचणी करण्यात आली, त्यानंतर या संसर्गाची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर केरळ राज्य सरकारने सर्व प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षांची स्थापना केली असून नोडल वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले आहेत.

September 10, 2024 8:49 AM September 10, 2024 8:49 AM

views 15

मंकीपॉक्सच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी करण्याचे केंद्राचे निर्देश

मंकीपॉक्स रोगाच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी आणि चाचण्या करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या रोगाबाबत जनतेत असलेली भीती दूर करण्यासाठी तसंच जनजागृतीसाठी उपाय योजावेत, असं केंद्रानं राज्यांना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं एकंदर परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असून, याबाबत सर्व राज्यांना शक्य ती सगळी मदत केली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितलं आहे.

August 25, 2024 12:37 PM August 25, 2024 12:37 PM

views 2

पुण्यात मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर सिंगापूर आणि दुबई इथून आलेल्या ५३१ प्रवाशांची तपासणी

मंकीपॉक्स विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडून पुणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येत आहेत. सिंगापूर आणि दुबई इथून आलेल्या ५३१ प्रवाशांची तपासणी पुणे विमानतळावर गेल्या सहा दिवसांत करण्यात आली. यात एकही संशयित रुग्ण आढळला नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या प्रवाशांची तपासणी केल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं. संशयित रुग्णांच्या तपासणीचा अहवाल महापालिकेकडे पाठवण्याच्या सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

August 21, 2024 7:48 PM August 21, 2024 7:48 PM

views 9

थायलंडमधे एमपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला

थायलंडमधे आज एमपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला. हा रुग्ण कांगोमधून थायलंडमधे आल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याच्या आरोग्य चाचण्या करण्यात येत असून त्याला विलगीकरणात पाठवल्याचं थायलंडच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. आफ्रिकेबाहेर थायलंड आणि स्वीडन या देशांमधे मंकी पॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. २०२२ पासून ११६ देशांमधे मिळून ९९ हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले असून  त्यातल्या २०८ जणांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते.  

August 20, 2024 7:23 PM August 20, 2024 7:23 PM

views 15

मंकीपॉक्स विषाणूच्या संशयित रुग्णांवर उपचार करण्याविषयी एम्सकडून मार्गदर्शक सूचना जारी

मंकीपॉक्स विषाणूच्या संशयित रुग्णांवर उपचार करण्याविषयी एम्स अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ताप, पुरळ असलेल्या किंवा मंकीपॉक्स असणाऱ्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी निवडलं जाईल, असं एम्सनं म्हटलं आहे. संशयित रुग्णाला तत्काळ विलगीकरणात ठेवण्यात यावं असंही एम्सनं मार्गदर्शक सूचनेत म्हटलं आहे.  एम्सने मंकीपॉक्स रुग्णांसाठी पाच खाटा आरक्षित ठेवल्या असून या रुग्णांवर सफदरजंग रुग्णालयात उपचार करण्यात येतील.  जागतिक आरोग्य संघट...

August 17, 2024 8:32 PM August 17, 2024 8:32 PM

views 10

देशात मंकीपॉक्स आजाराचा एकही रुग्ण नाही – आरोग्य मंत्रालय

देशात आत्तापर्यंत मंकीपॉक्स आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. मंकीपॉक्स हा आजार गंभीर स्वरूपाचा असून जागतिक पातळीवर याबद्दल WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं सतर्कता जाहीर केली आहे, त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयानं आज स्पष्टीकरण दिलं. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या एका बैठकीत मंकीपॉक्स या आजाराची देशातली परिस्थिती आणि उपयायोजनांच्या तयारीचा आढावा घेतला. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्र...