December 14, 2024 5:01 PM

views 34

इंदोर आणि उज्जैनमध्ये क्रिकेट सट्टेबाजांच्या विविध ठिकाणी सक्तवसूली संचालनालयाचे छापे

सक्तवसूली संचालनालयानं इंदोर आणि उज्जैनमध्ये क्रिकेट सट्टेबाजांच्या विविध ठिकाणी काल छापे टाकले. मनी लॉन्ड्रींगच्या आरोपावरून हे छापे मुख्यतः आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस आणि क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणाऱ्या पियुष चोपडाशी संबंधित विविध ठिकाणांवर टाकण्यात आले. एका संकेतस्थळाच्या माध्यमातून सट्टेबाजी चालवली जात असून यात पैशांची देवाणघेवाण हवालाद्वारे केली जात असल्याची माहिती सक्तवसूली संचालनालयाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

July 12, 2024 2:45 PM

views 28

मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने माजी मंत्री बी. नागेंद्र यांना चौकशीसाठी घेतले ताब्यात

कर्नाटकमधल्या महर्षि वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री बी नागेंद्र यांना सक्तवसुली संचालनालयानं आज  चौकशीसाठी ताब्यात घेतलं. अनुसूचित जमाती विकास महामंडळातील १८७ कोटी रुपये बेकायदा हस्तांतरीत करण्यात आले. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये  २० ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर आज माजी मंत्री बी नागेंद्र यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.