December 15, 2024 1:58 PM December 15, 2024 1:58 PM

views 13

मोल्दोव्हाचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री मिहेल पॉपसॉय भारताच्या दौऱ्यावर

मोल्दोव्हाचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री मिहेल पॉपसॉय हे भारताच्या दौऱ्यावर असून त्यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. पॉपसॉय यांच्या भेटीमुळे भारत-मोल्दोव्हा संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांमधील भागीदारी वाढेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी त्यांचं स्वागत करताना म्हटलं आहे.