July 17, 2024 1:42 PM July 17, 2024 1:42 PM

views 4

देशभरात आशुरा-ए-मुहर्रम निमित्त श्रद्धा आणि भक्तीपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन

आशुरा-ए-मुहर्रम आज देशाच्या विविध भागांमध्ये मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तीभावानं पाळला जात आहे. या दिवशी प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांनी, सत्य, सत्व आणि न्याय या तत्वांसाठी करबलामध्ये हौतात्म्य पत्करलं होतं. त्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस पाळला जातो.   यानिमित्तानं दिल्लीत जामा मशीद, हजरत निजामुद्दीन, ओखला आणि मेहरौलीसह वेगवेगळ्या ठिकाणी मोहरमच्या मिरवणुका काढल्या जात आहेत. करबला हुतात्म्यांच्या सर्वोच्च बलिदानाला उजाळा देणाऱ्या धार्मिक सभा सुद्धा होत आहेत. ...