January 23, 2025 6:46 PM January 23, 2025 6:46 PM
10
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचं निधन
पर्यावरण आणि वनहक्क चळवळीतले ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचं काल मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरमधे निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. गडचिरोली लेखा मेंढा गावाला देशपातळीवर ओळख निर्माण करुन देणारे मोहन हिराबाई हिरालाल यांच्यावर महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव होता. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीचे ते सक्रीय सदस्य होते. १९८४ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी वृक्षमित्र संघटनेची स्थापना...