March 31, 2025 7:45 PM March 31, 2025 7:45 PM

views 12

नागपुरात भारती कृष्ण विद्या विहार इथं वैदिक गणिताचं गुणवत्ता केंद्र उभारलं जावं-मुख्यमंत्री

नागपुरात भारती कृष्ण विद्या विहार इथं वैदिक गणिताचं गुणवत्ता केंद्र उभारलं जावं, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल, असं आश्वासनही त्यानी दिलं. ते आज भारती कृष्ण विद्या विहार शाळेत शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज लिखित वैदिक गणिताच्या दोन खंडांच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताची महती आणि उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचणं गरजेचे आहे, असं ते म्हणाले.  &n...

October 13, 2024 9:27 AM October 13, 2024 9:27 AM

views 36

सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास कायदेशीर व्यवस्थेद्वारे नियंत्रित करण्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील रेशीमबाग मैदानावरील विजयादशमी सोहोळयासाठी मुख्य अतिथि म्हणून इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के. राधाकृष्णन तसंच सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. सर्व सण आणि उत्सवामध्ये सर्वांचा सहभाग असला पाहिजे असं भागवत यावेळी म्हणाले. बांग्लादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात त्यांनी चिंता व्यक्त केली आणि हिंदूंना एकजूट होण्याचं आवाहन केलं. आपल्या देशाची परंपरा आणि आपली संस्कृतीचा दाखला देऊन कोलकातासारख्या घटना परत घडू नयेत यासाठी आपण सर्वानी सावध राहायला हव...