December 11, 2024 10:05 AM December 11, 2024 10:05 AM

views 3

सीरियामध्ये मोहम्मद अल-बशीर यांची काळजीवाहू प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती

सीरियामध्ये मोहम्मद अल-बशीर यांची काळजीवाहू प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी १ मार्चपर्यंत ते अंतरिम सरकारचे नेतृत्व करतील. असं बशीर यानी दुरचित्रवाणीवरील संबोधनात सांगितलं. सिरीयामध्ये बंडखोरांच्या आंदोलनानंतर बशर अल असाद यांनी देश सोडून पलायन केलं आहे. या बंडखोरी करणाऱ्या गटाचं नेतृत्व करणारे मोहम्मद अल-बशीर, यांनी यापुर्वी वायव्येकडील एका छोट्या भागात प्रशासकीय काम केलं आहे.