August 5, 2024 8:05 PM August 5, 2024 8:05 PM
विविध पिकांचे दीड हजार पर्यावरणस्नेही वाण येत्या ५ वर्षात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील
विविध पिकांचे दीड हजार पर्यावरण स्नेही वाण येत्या ५ वर्षात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून अशा १०९ वाणांचं लोकार्पण लौकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यसभेत सांगितलं. फलोत्पादन निर्यातीचं उद्दिष्ट ठेवून पुढच्या ५ वर्षात देशभरात शंभर फलोद्यानं विकसित केली जाणार असून त्याकरता १८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असं ते म्हणाले. शेती फायद्याची करण्यासाठी वेगळा दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे असं सांगून,...