November 8, 2025 11:40 AM November 8, 2025 11:40 AM

views 42

दुष्काळी भागात मनरेगाचा ६५ टक्के निधी पाणी पुरवठा योजनांसाठी-केंद्रीय कृषी मंत्री

दुष्काळी भागात मनरेगाचा ६५ टक्के निधी पाणी पुरवठा योजनांसाठी खर्च केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यात शिरसाळा इथं शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न एवढं वाढवायचं आहे की, एकाही शेतकऱ्याला आत्महत्‍या करावी लागू नये, हे आपलं उद्दीष्ट असल्याचं चौहान यांनी सांगितलं.   ग्लोबल विकास ट्रस्टनं केलेलं काम पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनात खरोखरच आर्थिक क्रांती घडू शकते हा विश्वास वाटत असल्याचं नमूद करत, केंद्र सरकार ग्लोब...

March 18, 2025 2:47 PM March 18, 2025 2:47 PM

views 14

मनरेगा अंतर्गंत मजुरांना वेतन आणि कामाच्या दिवसांची संख्या वाढवण्याची सोनिया गांधींची मागणी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा - मनरेगा अंतर्गंत मजुरांना कायद्यानुसार किमान वेतन आणि त्यांच्या कामाच्या दिवसांची संख्या वाढवण्याची मागणी खासदार सोनिया गांधी यांनी राज्यसभेत शून्य प्रहारात केली.    केंद्र सरकार मनरेगा पद्धतशीरपणे कमकुवत करत असल्याचा आरोपही गांधी यांनी यावेळी केला. गरीबांसाठी वरदान ठरलेली मनरेगा योजना पुढं चालू ठेवण्यासाठी तसंच त्याची  व्याप्ती वाढवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली.