November 11, 2025 7:53 PM
700
राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर
राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडती जाहीर झाल्या. परभणी महानगरपालिकेतल्या १६ प्रभागांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण- महिला तसंच सर्वसाधारण अशा प्रवर्गांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सोडत जाहीर झाली. त्यात ११५ सदस्यांपैकी ५८ जागा महिलांसाठी तर इतर मागास प्रवर्गासाठी ३१, अनुसूचित जातीसाठी २२ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. धुळे शहरातील राजर्षी शाह...