August 23, 2025 8:15 PM August 23, 2025 8:15 PM

views 11

गणेशोत्सवात मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर !

यंदाच्या गणेशोत्सवात मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा एमएमआरडीएने केली आहे. येत्या २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान  अंधेरी पश्चिम  आणि गुंदवली या मार्गिकांवरील मेट्रो गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार आहेत. या दोन्ही  स्थानकांवरून शेवटची गाडी ११  ऐवजी मध्यरात्री १२ वाजता धावेल. या काळात आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी गर्दीच्या वेळेत गाड्यांची वारंवारता अधिक असेल, तर रविवारी दर १० मिनिटांनी गाडी उपलब्ध असेल. 

June 18, 2025 6:34 PM June 18, 2025 6:34 PM

views 10

मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी MMRDA चं ‘मनुष्यबळ धोरण’ लागू

मुंबईच्या शहरी परिवहनाला, मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी एमएमआरडीए, अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं "मनुष्यबळ धोरण" लागू केलं आहे.    या धोरणानुसार मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या प्रकल्पाच्या विलंबाला कंत्राटदार जबाबदार असतील. कंत्राटदाराकडून मनुष्यबळात २५ ते ५० टक्के घट झाली तर त्याला दररोज १ लाख, आणि ५० टक्क्यापेक्षा जास्त घट झाली तर दररोज २ रुपये लाख दंड आकारला जाईल. प्रकल्पातल्या महत्त्वाच्या टप्प्यांच्या वेळापत्रकात विलंब झाला तर करारातल्या तरतुदीनुसार अतिरिक्त दंड ...

April 8, 2025 7:09 PM April 8, 2025 7:09 PM

views 13

MMRDA चे इंडिया ग्लोबल फोरममधे ४ लाख ७ हजार कोटी रूपयांचे सामंजस्य करार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आज मुंबईत जियो वल्ड सेंटर इथं आयोजित इंडिया ग्लोबल फोरम २०२५च्या कार्यक्रमात ४ लाख ७ हजार कोटी रूपयांचे सामंजस्य करार केले. रस्ते, रेल्वे, पिण्याचे पाणी, महामार्ग, सागरी किनारा मार्ग, उड्डाणपुल आणि मेट्रोसारख्या विविध प्रकल्पांसाठी देशातल्या सार्वजनिक कंपन्यांसोबत हे करार करण्यात आले.

December 29, 2024 3:22 PM December 29, 2024 3:22 PM

views 6

बांधकामामुळे उडणारी धूळ रोखण्यासाठी एमएमआरडीए चे कठोर मार्गदर्शक तत्वं जारी

बांधकामामुळं निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केल्यास २० लाख रुपयेपर्यंत दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईत वायू प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीनं बांधकामामुळे उडणारी धूळ रोखण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं कठोर मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. सुरवातीला ५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात येईल. नंतरही उल्लंघन झालं तर दंडाची रक्कम २० लाख रुपये पर्यंत वाढवण्यात येईल, तसंच बांधकाम रोखण्यात येईल असं या मार्गदर्शक तत्वात म्हटलं आहे.

October 1, 2024 3:37 PM October 1, 2024 3:37 PM

views 13

नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईतल्या मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ

येत्या नवरात्रोत्सवानिमित्त ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान मुंबईतल्या मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा निर्णय घेतला असून या कालावधीत रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त मेट्रो चालवल्या जातील, अशी माहिती मेट्रोच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

September 13, 2024 8:43 AM September 13, 2024 8:43 AM

views 9

एमएमआरडीए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात सामंजस्य करार

एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात आज सामंजस्य करार झाला. ‘मुंबई महानगर क्षेत्रः जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकास’ या निती आयोगाच्या अहवालाचं मुंबईत प्रकाशन झालं. त्यावेळी हा करार झाला. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष क्लॉस श्वाब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक मंत्री रविंद्र चव्हाण, गृहनिर्माण म...