April 13, 2025 6:32 PM April 13, 2025 6:32 PM

views 5

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे नांदेड दौऱ्यावर

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. कौठा इथं धनगर समाज बांधव आणि महायुतीच्या सर्व पक्षांच्या वतीनं त्यांचा सत्कार होणार आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची उपस्थिती असणार आहे. 

March 31, 2025 6:36 PM March 31, 2025 6:36 PM

views 14

सोलापूर विद्यापीठाकडे असलेल्या जमिनीचा प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लावू-राम शिंदे

सोलापूर विद्यापीठाकडे असलेल्या जमिनीचा प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लावू असं आश्वासन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिलं आहे. सोलापूर इथे झालेल्या एका समारंभात ते बोलत होते. विद्यापीठाकडे ४७२ एकर जमीन असली तरी त्यापैकी बरीचशी जमीन वनविभागाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे विद्यापीठात अंतर्गत सोयीसुविधा तयार करण्यासाठी अडचणी येत असल्याचं कुलगुरू प्रकाश महानोर यांनी या कार्यक्रमात सांगितलं. त्यावर वन तसंच कृषी आणि उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची तसंच मंत्र्यांची बैठक घेऊ...

March 11, 2025 2:40 PM March 11, 2025 2:40 PM

views 6

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईच्या विधानभवन परिसरात आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.  मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनीही छत्रपती संभाजी महाराजांना समाजमाध्यमावरच्या संदेशात अभिवादन केलं आहे. 

February 9, 2025 7:04 PM February 9, 2025 7:04 PM

views 12

चौंडी विकास कामाच्या बृहत आराखड्यासंदर्भात लवकरच बैठक होणार-राम शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सामाजिक न्याय, महिला कल्याण, व्यापार, कृषी आणि न्याय व्यवस्थेसाठी केलेलं कार्य आजही देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे, असं विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगर मध्ये चौंडी इथं  अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त आयोजित अभिवादन समारंभात ते आज बोलत होते. चौंडी विकास कामाच्या बृहत आराखड्यासंदर्भात  लवकरच मुख्यमंत्र्यांच्या  अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.

December 19, 2024 1:49 PM December 19, 2024 1:49 PM

views 17

विधानपरिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांनी पदभार स्वीकारला

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची निवड झाल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे यांना सभापतींच्या खुर्चीवर आसनस्थ केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती पदावर सभागृहाने एकमताने निवड केल्या बद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले .