November 13, 2025 6:58 PM November 13, 2025 6:58 PM

views 25

भारत आणि श्रीलंका मित्र शक्ती संयुक्त लष्करी सरावाची अकरावी आवृत्ती सुरू

भारत आणि श्रीलंका या देशांमधल्या मित्र शक्ती २०२५ या संयुक्त लष्करी सरावाची अकरावी आवृत्ती कर्नाटकात बेळगाव इथे सुरू आहे. हा सराव गेल्या सोमवारपासून सुरू झाला असून येत्या २३ तारखेपर्यंत चालणार आहे. या सरावात आजच्या चौथ्या दिवशी ड्रोन ड्रील्ससह विविध लष्करी कवायतींचं व्यावहारिक प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. तसंच शोधमोहिम आणि नवीन तंत्रज्ञान असलेल्या उपकरणांचं प्रात्यक्षिकही सादर झालं. दोन्ही देशांमधली कायमस्वरुपी संरक्षण भागीदारी, कार्यक्षमता आणि परस्पर विश्वास अधोरेखित करणारा हा सराव असल्याचं भारत...

August 23, 2024 8:08 PM August 23, 2024 8:08 PM

views 3

भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त सैनिकी सराव ‘मित्र शक्ती’चा समारोप

भारत आणि श्रीलंका सैन्यदलांमधला दहावा संयुक्त  सैनिकी सराव  नुकताच पार पडला. श्रीलंकेतल्या मदुरू ओया इथल्या संरक्षण प्रशिक्षण शाळेत पार पडलेल्या या सरावसत्राला “मित्र शक्ती” असं नाव देण्यात आलं आहे. यावेळी श्रीलंकेतले भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेचे संरक्षण राज्यमंत्री प्रेमिथा बंधारा तेन्नाकुन यावेळी उपस्थित होते. त्यानंतर झा यांनी यात सहभागी झालेल्या राजपुताना रायफल्सच्या १०६ भारतीय जवानांची आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली. श्रीलंकेच्या गजबा रेजिमेंटने या सराव सत्रात भाग घेतला. श्रीलंका ...