November 17, 2024 10:36 AM November 17, 2024 10:36 AM
27
‘मिशन झिरो डेथ’ द्वारे केलेल्या प्रयत्नांमुळे रेल्वे रुळांवरील मृत्यूदरात घट
‘मिशन झिरो डेथ’चा एक भाग म्हणून रेल्वे रुळांवरील मृत्यू कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं केलेल्या अथक प्रयत्नांमुळे, अत्यंत प्रभावी परिणाम दिसत आहेत. मध्य रेल्वेनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत रेल्वे रुळावरील मृत्युंची संख्या 14 टक्क्यांनी घटली आहे तर जखमी झालेल्या व्यक्तींची संख्या 10 टक्क्यांनी घटली आहे. अतिक्रमण हे या घटनांचं एक प्रमुख कारण आहे असं या प्रकरणांचं बारकाईनं विश्लेषण केल्यावर दिसून आलं असं मध्य रेल्वेनं म्हटलं आहे. या कालावधीत एकंदर 3 हजार ...