October 16, 2025 3:35 PM October 16, 2025 3:35 PM

views 11

मिशन उडान अंतर्गत अकोला जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

मिशन उडान अंतर्गत अकोला जिल्ह्यात पोलीस दलात महिला आणि बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गंत काल  पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस काका, पोलिस दिदी आणि एसजेपीयू पथकासाठी कार्यशाळा घेण्यात आली.   मार्गदर्शनासाठी आलेल्या तज्ज्ञांनी बालकांची चौकशी करताना पोलिसांना येणाऱ्या अडी-अडचणींचं, समस्यांचं  निराकरण केलं. बाल न्याय मंडळ आणि बाल कल्याण समितीमधील फरक समजावून सांगितला.