June 24, 2025 9:43 AM June 24, 2025 9:43 AM

views 3

इराणचा कतारमधील अल उदेद हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला

इराणनं कतारमधील अल उदेद हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. हा अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वांत मोठा लष्करी तळ आहे. इराकमधील ऐन अल-असद तळावरदेखील इराणनं हल्ला केल्याचं वृत्त आहे.   कतारमधील अमेरिकेचा हवाईतळ सावधगिरीचा उपाय म्हणून आधीच रिकामा करण्यात आला होता आणि त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालींनी येणाऱ्या क्षेपणास्त्रांना यशस्वीरित्या रोखल्यानं या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असं कतार आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.   या संकटामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला असून, एअर...

April 13, 2025 7:51 PM April 13, 2025 7:51 PM

views 9

रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधल्या ३२ नागरिकांचा मृत्यू, ८४ जण गंभीर

युक्रेनच्या ईशान्य भागातील सुमी शहरात आज रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन मुलांसह ३२ लोक ठार झाले तर, ८४ जण गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींमध्ये दहा लहान मुलांचाही समावेश असल्याचं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.  पाम संडेच्या निमित्तानं नागरिक मोठ्या संख्येनं चर्चमधल्या प्रार्थना सभेसासाठी जमले होते, तसंच रस्त्यांवरही मोठी गर्दी होती त्यावेळी हा हल्ला झाला. २०२३ नंतर रशियानं युक्रेनच्या नागरिकांवर केलेला हा सर्वात प्राणघातक हल्ला ठरला आहे.    ह...