April 24, 2025 1:06 PM April 24, 2025 1:06 PM
43
कीववर रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात २ ठार, ५४ जण जखमी
यूक्रेनची राजधानी कीववर रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात दोन जण ठार तर ५४ जण जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. रशियाकडून केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे कीव शहरात ठिकठिकाणी आगी लागल्या. त्यामुळे निवासी इमारतींचं नुकसान झालं असून त्यांच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकले असण्याची भीती यूक्रेनच्या प्रसार माध्यमांनी व्यक्त केली आहे. खारकिव शहरात बॉम्बस्फोट झाल्याचंही वृत्त आहे.