June 1, 2025 9:44 AM June 1, 2025 9:44 AM

views 69

मिस थायलंड ओपल सुचाता चुआंगश्री हिला मिस वर्ल्ड 2025 चा किताब

हैदराबाद इथं काल रात्री झालेल्या ७२व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत मिस थायलंड ओपल सुचाता चुआंगश्री हिला मिस वर्ल्ड 2025 चा किताब देण्यात आला. इथिओपियाची हॅसेट डेरेजे अदमासू ही पहिली उपविजेती आणि पोलंडची माजा क्लाज्दा ही दुसरी उपविजेती ठरली. फुकेतची 22 वर्षीय सुचातानं आत्मविश्वास आणि महिलांच्या आरोग्याविषयीच्या जागरूकतेमुळं वेगळा ठसा उमटवला. जगभरातील 100 हून अधिक स्पर्धकांनी यात भाग घेतला.