December 24, 2024 12:59 PM December 24, 2024 12:59 PM

views 4

उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश राज्यांमधल्या ग्रामीण भागासाठी अनुदान जारी

उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधल्या ग्रामीण भागासाठी केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांहून अधिकचं अनुदान जारी केल्याची माहिती पंचायती राज मंत्रालयाने दिली आहे. उत्तर प्रदेशासाठी १ हजार ५९८ कोटींहून अधिक तर आंध्र प्रदेशासाठी ४४६ कोटी रुपयांहून अधिक निधी जारी करण्यात आला आहे. या अनुदानाचा वापर पंचायती राज संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारे केला जाईल. ग्रामीण भागातल्या स्थानिक प्रशासनात बदल घडवण्यासाठी सरकार अशा प्रकारे थेट अनुदान देत असल्याची माहितीही मंत्रालयाने दिली आहे...

December 9, 2024 7:38 PM December 9, 2024 7:38 PM

views 4

राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमधे राज्याला ६ पुरस्कार जाहीर

केंद्रीय पंचायत राज मंत्रालयानं 2022-23 या वर्षाकरता राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांसाठी देशभरातून विविध श्रेणींमध्ये 45 पुरस्कार विजेत्यांची निवड जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायती, 1 पंचायत गट, आणि एक संस्था, यांना 6 पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मान्याची वाडी ग्रामपंचायतीनं नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत सर्वोत्तम ग्राम पंचायत पुरस्कार, तसंच ग्राम उर्जा स्वराज विशेष ग्राम पंचायत अशा दोन पुरस्कारांवर आपलं नाव कोर...