August 17, 2024 8:32 PM August 17, 2024 8:32 PM
18
देशात मंकीपॉक्स आजाराचा एकही रुग्ण नाही – आरोग्य मंत्रालय
देशात आत्तापर्यंत मंकीपॉक्स आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. मंकीपॉक्स हा आजार गंभीर स्वरूपाचा असून जागतिक पातळीवर याबद्दल WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं सतर्कता जाहीर केली आहे, त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयानं आज स्पष्टीकरण दिलं. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या एका बैठकीत मंकीपॉक्स या आजाराची देशातली परिस्थिती आणि उपयायोजनांच्या तयारीचा आढावा घेतला. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्र...