November 25, 2025 8:36 PM November 25, 2025 8:36 PM

views 39

एकात्मिक निवृत्तीवेतन योजना (UPS) स्वीकारण्यासाठी शेवटची तारीख जाहीर!

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात एनपीएस अंतर्गत येणारे पात्र कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना एकात्मिक निवृत्तीवेतन योजना म्हणजेच यूपीएस स्वीकारण्यासाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख असेल, अशी माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे. यासाठी त्यांना सीआरए यंत्रणेद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल, किंवा प्रत्यक्ष अर्ज स्थानिक नोडल कार्यालयात जमा करता येईल.    यूपीएस अंतर्गत, योजना बदलण्याची संधी, करात सवलत, राजीनामा आणि सक्तीच्या निवृत्तीचे फायदे असे अनेक लाभ कर्मचाऱ्यांना मिळतात. ते मिळवण्यासाठी केंद्...

July 31, 2025 10:01 AM July 31, 2025 10:01 AM

views 3

उद्यापासून बँकिंग सुधारणा कायदा 2025 अमलात येणार

बँकिंग सुधारणा कायदा 2025 उद्यापासून अमलात येणार आहे. बँकिंग क्षेत्रातल्या प्रशासकीय मानकांमध्ये आणि ठेवीदार, गुंतवणूकदारांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने हा कायदा करण्यात आला. सार्वजनिक बँकांच्या लेखापरीक्षणात सुधारणा करणे आणि सहकारी बँकांच्या संचालकांच्या कार्यकाळात वाढ करणे हादेखील या कायद्याच्या अंमलबजावणीचा हेतू असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. 

July 9, 2025 9:49 AM July 9, 2025 9:49 AM

views 1

निष्क्रीय असलेली प्रधानमंत्री जनधन बँक खाती बंद करण्याचे निर्देश बँकांना नाहीत – अर्थ मंत्रालय

निष्क्रीय असलेली प्रधानमंत्री जनधन बँक खाती बंद करण्याचे कोणतेही निर्देश बँकांना दिलेले नाहीत, असं केंद्रीय अर्थमंत्रालयानं काल स्पष्ट केलं. वित्तीय सेवा विभागानं अशी खाती बंद करायला सांगितल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झाल्यानंतर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. निष्क्रीय जनधन खात्यांच्या संख्येवर मंत्रालयाची देखरेख असून संबंधित खातेदारांशी संपर्क साधून त्यांची खाती कार्यरत ठेवण्याचा सल्ला वेळोवेळी देण्यात येत असल्याचंही मंत्रालयाने म्हटलं आहे.

August 2, 2024 7:06 PM August 2, 2024 7:06 PM

views 15

३१ जुलैपर्यंत विक्रमी ७ कोटी २८ लाख जणांचे आयकर विवरणपत्र दाखल

मूल्याकंन वर्ष २०२४- २५ साठी ३१ जुलैपर्यंत विक्रमी ७ कोटी २८ लाख जणांनी आयकर विवरणपत्र दाखल केल्याची माहिती वित्त मंत्रालयानं दिली आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही संख्या साडे सात टक्क्यांनी अधिक असल्याचं मंत्रालयानं जाहीर केलं आहे. यंदा विवरणपत्र दाखल करणाऱ्यांपैकी सुमारे ५ कोटी २७ लाख जणांनी नव्या करप्रणालीनुसार, तर २ कोटी १ लाख जणांनी जुन्या करप्रणालीनुसार विवरणपत्र दाखल केलं आहे. विवरणपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ जुलैला सर्वाधिक ६९ लाख ९२ हजार विवरणपत्र दाखल करण्यात आ...