June 13, 2025 10:35 AM June 13, 2025 10:35 AM
7
अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं आवाहन
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना योग्य ती सुरक्षा खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. लॉस एंजेलिसमधील परिस्थितीबद्दल काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे आवाहन केलं. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संपर्कात आहे, असंही ते म्हणाले.