October 12, 2025 10:09 AM October 12, 2025 10:09 AM

views 31

शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी युपीआयचा वापर करण्याचं शिक्षण मंत्रालयाचं शाळांना आवाहन

शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी युपीआयचा वापर करण्याचं शिक्षण मंत्रालयाचं शाळांना आवाहन शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क गोळा करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळांनी युपीआयचा वापर करण्याचं आवाहन शिक्षण मंत्रालयानं शाळांना केलं आहे. राज्य, केंद्रशासित प्रदेश तसंच एनसीइआरटी, सीबीएससी, केंद्रीय विद्यालय संघटना, राष्ट्रीय विद्यालय संघटनांसारख्या स्वायत्त संस्थांना पत्राद्वारे हे आवाहन करण्यात आलं आहे. शाळांमधील कायदेविषयक, धोरणात्मक आणि संस्थात्मक सुधारणांच्या माध्यमातून जीवन आणि श...

December 23, 2024 8:39 PM December 23, 2024 8:39 PM

views 11

इयत्ता पाचवी ते आठवीसाठी सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं इयत्ता पाचवी आणि आठवीत सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचं धोरण आज रद्द केलं. आता अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढच्या वर्गात जाऊ शकणार नाहीत. त्यांना दोन महिन्यांच्या आत फेरपरीक्षा देऊन पुढच्या वर्गात जाता येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी दिली.    अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढता येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या चांगल्या भवितव्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असल्याच...

August 23, 2024 7:37 PM August 23, 2024 7:37 PM

views 9

शाळेतल्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे नवे दिशानिर्देश जारी

शाळेतल्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करण्याबाबतच्या तरतुदींचा त्यात समावेश आहे. या निर्देशांमध्ये प्रतिबंधात्मक तरतुदी, विविध संबधित घटकांची जबाबदारी निश्चिती, प्रक्रिया अहवाल, संबधित कायदेशीर तरतुदी, सहाय्य आणि समुपदेशन याबरोबरच सुरक्षित वातावरण याचे मापदंड यावर भर दिला आहे.