April 1, 2025 8:04 PM April 1, 2025 8:04 PM
19
कोळसा क्षेत्रात १०० कोटी टन उत्पादनाचा टप्पा पार
देशातल्या कोळसा क्षेत्रानं, काल संपलेल्या आर्थिक वर्षात १०० कोटी टन उत्पादनाचा टप्पा पार केला. कोळसा मंत्रालयानं आज याबाबतची आकडेवारी जाहीर केली. गेल्या आर्थिक वर्षात १०४ कोटी ७० लाख टनापेक्षा जास्त कोळसा उत्पादन झालं. आधीच्या वर्षापेक्षा ही वाढ ४ पूर्णांक ९९ शतांश टक्के इतकी आहे. यापैकी १०२ कोटी ४० लाख टन कोळसा गोदामं आणि प्रकल्पांमधे पाठवला गेला. हे प्रमाण देखील आधीच्या वर्षीच्या तुलनेत ५ पूर्णांक ३४ शतांश टक्क्यानं वाढलं आहे.