October 12, 2025 6:10 PM October 12, 2025 6:10 PM

views 21

शेतकऱ्यांच्या पिकाला चांगली किंमत, उत्पादकताही वाढली – कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

देशातले ५२ लाखापेक्षा जास्त शेतकरी आता अकराशेपेक्षा जास्त कृषी उत्पादन संघटनांशी जोडलेले असून याद्वारे त्यांच्या पिकाला चांगली किंमत मिळत असून उत्पादकताही वाढली आहे, असं कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. या सर्व संघटनांची उलाढाल १५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

May 4, 2025 6:56 PM May 4, 2025 6:56 PM

views 12

भारतातील पहिल्या दोन जीनोम संपादित भाताच्या जातींचं कृषीमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या दोन जीनोम संपादित भाताच्या जातींचं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज अनावरण केलं. भाताच्या या दोन्ही जाती उत्पादन खर्च कमी करतील आणि देशातलं भाताचं उत्पादन वाढवतील, असं ते यावेळी म्हणाले. या प्रकल्पात सहभागी असलेल्या कृषी शास्त्रज्ञांचं देखील त्यांनी अभिनंदन केलं. भाताच्या या दोन्ही जाती केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर जनतेसाठी देखील फायदेशीर ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलं.

February 19, 2025 3:33 PM February 19, 2025 3:33 PM

views 11

ग्रामीण रहिवाशांसाठी केंद्र सरकारच्या विविध उपाययोजना – मंत्री शिवराज सिंह चौहान

ग्रामीण भागातल्या रहिवाशांचं जीवन सुखकर करण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजन केल्या असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सांगितलं आहे. आफ्रिकन – आशियाई ग्रामविकास संघटनेच्या कार्यकारिणीच्या आज नवी दिल्लीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. मनरेगा, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना, एक पेड मां के नाम, लखपती दीदी योजना अशा अनेक कल्याणकारी योजनांचा उल्लेख त्यांनी केला.    

January 27, 2025 1:14 PM January 27, 2025 1:14 PM

views 10

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं प्रतिपादन

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि समृद्धीसाठी केंद्र सरकार हर तऱ्हेनं प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. ७६ व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित शेतकऱ्यांशी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत आहे, असं त्यांनी सांगितलं. ‘शेतातून थेट ग्राहकांपर्यंत’ या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना दलालांच्या मध्यस्थीशिवाय आपला माल विकून उत्पन्न वाढवता येत आहे, असंही ते म्हणाले.  

January 14, 2025 9:20 AM January 14, 2025 9:20 AM

views 8

देशात १३ लाख ६८ हजार क्विंटल सोयाबीनची किमान आधारभूत किंमतीनं खरेदी – कृषीमंत्री

सरकारनं आतापर्यंत जवळपास १३ लाख ६८ हजार क्विंटल सोयाबीनची किमान आधारभूत किंमतीनं खरेदी केली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत तर राजस्थानात ४ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली असल्याचंही चौहान यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. राज्य सरकारांनी केलेल्या मागणीनुसार खरेदीची मुदत वाढवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्यानं काम करत असल्याचं सांगत शेत...