November 17, 2024 3:47 PM November 17, 2024 3:47 PM

views 7

केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय होईल, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारने राज्यात जी विकासकामं केली आहेत, त्यामुळे राज्यातला मतदार नक्कीच महायुतीच्या बाजूने उभा राहील, असा विश्वासही चौहान यांनी यावेळी व्यक्त केला.  

August 2, 2024 8:08 PM August 2, 2024 8:08 PM

views 9

कृषीक्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता केंद्रसरकार वचनबद्ध – कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान

कृषीक्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता केंद्र सरकार वचनबद्ध असून यंदाच्या अर्थसंकल्पात कृषिक्षेत्रासाठी १ लाख ३२ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची तरतूद केली असल्याचं केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज राज्यसभेत सांगितलं. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एप्रिल २०२१ पासून एक लाख तीन हजार किलोमीटरपेक्षा अधिक रस्ते बांधले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.   खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती ही समाजातली अपप्रवृत्ती असून तिला वेळीच आळा घालणं अत्या...