March 30, 2025 10:52 AM March 30, 2025 10:52 AM

views 11

महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची रामदास आठवले यांची मागणी

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. यासाठी आठवले यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. सरकारनं १९४९ चा महाबोधी मंदिर कायदा रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली. या मागणीसाठी बौद्ध भिक्खूंच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनाला नितीश कुमार यांनी भेट द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं. नितीश कुमार यांनी या संदर्भात लवकरच निर्णय ...

March 23, 2025 8:31 PM March 23, 2025 8:31 PM

views 12

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विकास करण्यासाठी निधी देण्याची रामदास आठवले यांची मागणी

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विकास करण्यासाठी राज्य सरकारनं ५०० कोटी रुपयांचा निधी दोन टप्प्यात द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. छत्रपती संभाजी नगर इथं पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सलंस लर्निंगचं उद्घाटन करताना ते बोलत होते.   पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विस्तार करून वैद्यकीय महाविद्यालय, परिचर्या महाविद्यालय, वसतिगृह आदी उपक...

December 30, 2024 7:54 PM December 30, 2024 7:54 PM

views 14

परभणीत संविधानाचा अवमान केला गेला – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज परभणी जिल्ह्याला भेट देऊन, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी  चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.    यावेळी आठवले यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर वाकोडे यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत आणि घरातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  ...

December 14, 2024 6:58 PM December 14, 2024 6:58 PM

views 12

सरकार दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक विशेष योजना राबवत आहे – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

विशेष गरज असलेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक विशेष योजना राबवत असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल तेलंगणात सिकंदराबादमध्ये मानसिक दुर्बल सबलीकरण राष्ट्रीय संस्था इथं दिव्यांग व्यक्तींना शैक्षणिक सामग्रीचं वाटप केल्यावर बोलत होते. या संस्थेतल्या विदयार्थ्यांना उत्कृष्ट सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर त्यांनी ब्रेल पार्क इथं ‘ब्रेल फॉर ऑल’ प्रशिक्षण सं...

December 14, 2024 2:27 PM December 14, 2024 2:27 PM

views 12

विशेष गरज असलेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध – मंत्री रामदास आठवले