October 16, 2025 9:09 AM October 16, 2025 9:09 AM

views 84

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, काल रात्री त्यांचं पुण्यात आगमन झालं. आज सकाळी सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.   तसंच डीआरडीओ इथं संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर ते नाशिकला रवाना होती. नाशिकमध्ये स्वदेशी बनावटीच्या 'तेजस एमके-वन ए' या लढाऊ विमानाच्या उत्पादनाच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल, तसंच ओझर मिनी स्मार्ट टाऊनशिपचं उद्घाटनही राजनाथ सिंह यांच्...

July 7, 2025 3:19 PM July 7, 2025 3:19 PM

views 9

संरक्षण क्षेत्रातल्या स्वदेशी उत्पादनांची मागणी वाढल्याची संरक्षण मंत्र्यांची माहिती

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केलेल्या शस्त्रास्त्रांच्या कामगिरीनंतर संरक्षण क्षेत्रातल्या भारतात तयार झालेल्या उत्पादनांसाठी जगात मागणी वाढल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. संरक्षण लेखा विभागाच्या नियंत्रक अधिकाऱ्यांच्या  नवी दिल्ली इथं आयोजित परिषदेचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. भारताच्या सरंक्षण उद्योगांमध्ये प्रचंड क्षमता असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी झाल्याचंही सिंग यावेळी म्हण...

June 11, 2025 10:59 AM June 11, 2025 10:59 AM

views 12

2029 पर्यंत देशाची संरक्षण उत्पादन क्षमता 3 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं संरक्षणमंत्र्यांचं उद्दिष्ट

2029 पर्यंत देशाची संरक्षण उत्पादन क्षमता 3 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल सांगितलं. उत्तराखंडमधील देहरादून इथं आयोजित 'राष्ट्रीय सुरक्षितता आणि दहशतवाद' या विषयावरील कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. या क्षेत्रातील देशाची निर्यात 50 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.     2014 मध्ये वार्षिक एकंदर 40 हजार कोटी रुपये असलेलं संरक्षण उत्पादन आज सव्वा लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झालं आहे आणि हा आतापर्यंतची ही व...

January 20, 2025 7:46 PM January 20, 2025 7:46 PM

views 7

महाराष्ट्राच्या मनन शर्मा या NCC छात्राला रक्षा मंत्री पदक

देशातला युवा ही देशाची संपत्ती असून ते राष्ट्र उभारणी आणि समृद्धीमध्ये योगदान देतील, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 ला संबोधित करताना बोलत होते.  सर्व छात्रांनी एकता आणि राष्ट्रीय अखंडतेला आपल्या जीवनात प्राधान्य द्यावं, असं आवाहनही सिंग यांनी केलं. यावेळी छात्र सनेतल्या विद्यार्थ्यांनी संरक्षण मंत्र्यांना मानवंदना दिली. काही छात्रांनी केलेल्या अद्वीतीय कामगिरीमुळे त्यांना रक्षामंत्री पदकांनी गौरवण्यात आलं...

January 15, 2025 8:04 PM January 15, 2025 8:04 PM

views 13

लष्कर दिन हा वर्षाचे ३६५ दिवस, डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करणाऱ्या लष्कराच्या जवानांचे आहेत – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

लष्कर दिन हा फक्त एका दिवसाचा कार्यक्रम नाही, तर वर्षाचे ३६५ दिवस, डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करणाऱ्या लष्कराच्या जवानांचे आहेत, असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ७७व्या लष्कर दिनाचं मुख्य संचलन आज पुण्यात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर झालं, त्यावेळी गौरवगाथा या कार्यक्रमात ते बोलत होते.  तत्पूर्वी, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मानवंदना स्वीकारली. लष्कर, पोलीस दल आणि महाराष्ट्र छात्रसेनेच्या महिला पथकाचा संचलनात सहभाग होता. प्रथमच नेपाळचा लष्करी वाद्...

January 10, 2025 11:05 AM January 10, 2025 11:05 AM

views 8

‘एरो इंडिया २०२५’ हवाई प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पुढील महिन्यात बेंगळुरू इथे होणाऱ्या 'एरो इंडिया 2025' या आशियातील सर्वात भव्य हवाई प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत, राजदूतांच्या गोलमेज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला, भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या 150 हून अधिक देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी होण्याची अपेक्षा आहे, असं संरक्षण मंत्रालयाने म्हंटलं आहे. 10 ते 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या हवाई प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना 'लक्षावधी संधींसाठीचा राजमार्ग' अर्थात 'रनव...

January 7, 2025 7:27 PM January 7, 2025 7:27 PM

views 2

देशाचं भवितव्य घडवण्याची शिक्षकांची महत्त्वाची भूमिका- राजनाथ सिंग

देशाचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. उत्तरप्रदेश माध्यमिक शिक्षक संघटनेच्या ५७व्या परिषदेचं उद्घाटन आज आग्रा इथं करताना ते बोलत होते. नेहमी योग्य पर्यायाची निवड करण्याचा विवेक विद्यार्थ्यांमधे रुजवण्याचं काम शिक्षक करीत असल्यानं त्यांची भूमिका महत्त्वाची आहे असं ते म्हणाले.

December 25, 2024 3:34 PM December 25, 2024 3:34 PM

views 14

अटल युवा महाकुंभ आणि अटल आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन

माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज लखनौ इथं अटल युवा महाकुंभ आणि अटल आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन केलं. राजनाथ सिंह यांनी संध्याकाळी अटल गीत गंगा या काव्यवाचन कार्यक्रमातही हजेरी लावली. उद्या  ते  लखनौमध्ये  होणाऱ्या सुशासन दिवस कार्यक्रमातही  सहभागी होणार आहेत.

August 21, 2024 12:51 PM August 21, 2024 12:51 PM

views 3

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २३ ऑगस्टपासून चार दिवसीय अमेरिका दौऱ्यावर

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी २३ ऑगस्टपासून चार दिवसीय अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन यांच्याशी ते या दौऱ्यात चर्चा करतील. या भेटीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातली जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. भविष्यातल्या संभाव्य संरक्षण सहकार्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गोलमेज परिषदेचं अध्यक्षस्थान राजनाथ सिंह भुषवतील. तसंच भारतीय समूदायाशी संवाद साधतील.