October 18, 2025 3:12 PM

views 77

अहिल्यानगर जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना मदत जाहीर

अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नूकसानीपोटी ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाख रूपयांची मदत महायुती सरकारनं जाहीर केल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वर्ग करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

January 3, 2025 7:40 PM

views 8

उजनी धरणातल्या पाणीसाठ्याचं सूक्ष्म नियोजन करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा ९७ टक्के  इतका आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सिंचनासाठी आणि संपूर्ण उन्हाळा पिण्याचं पाणी उपलब्ध राहील यासाठी सूक्ष्म नियोजन करावं,  धरणात पाणी उपलब्ध आहे म्हणून पाण्याची उधळपट्टी अजिबात करू नये, असं  आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं  आहे.