November 14, 2025 6:19 PM November 14, 2025 6:19 PM
26
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री’
एसटी, अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं उत्पन्नवाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी सर्वसमावेशक ‘पंचसूत्री आराखडा’ तयार केला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मुंबईत ही माहिती दिली. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिक स्पष्ट करत, सुधारणा, ‘वेग’ आणि ‘नियमितता’ या आधारे एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केल्याचं त्यांनी सांगितलं....