January 22, 2026 1:39 PM

views 2

तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी विरोधी पक्ष नेते पळणीसामी यांची भेट घेतली

तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज चेन्नईमध्ये अण्णा द्रमुक पक्षाचे महासचिव आणि विरोधी पक्ष नेते पळणीसामी यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या मित्र पक्षांशी आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी गोयल चेन्नई दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची उद्या तामिळनाडूमध्ये जाहीर सभा होणार असून ही सभा राज्याचं राजकीय चित्र बदलून टाकेल, असा विश्वास पळणीसामी यांनी व्यक्त केला. स्टालिन यांच्या सनातन विरोधातल्या...

January 10, 2026 6:39 PM

views 7

मुक्त व्यापार कराराशी संबंधित अडचणी दूर करून वाटाघाटींना वेग देण्याचे निर्देश

भारत आणि युरोपियन युनियनच्या व्यापार मंत्र्यांनी प्रस्तावित मुक्त व्यापार कराराशी संबंधित अडचणी दूर करून कराराला अंतिम रूप देण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना याबाबतच्या वाटाघाटींना वेग देण्याचे निर्देश दिले आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि युरोपियन युनियनचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफकोविक यांनी आज ब्रुसेल्समध्ये परस्परांची भेट घेतली आणि वाटाघाटींच्या प्रगतीचा आढावा घेतला.    वस्तूंसाठी बाजारपेठ प्रवेश, उत्पत्तीचे नियम आणि सेवा, यासह वाटाघाटींच्या विविध टप्प्यांवर ...

November 6, 2025 7:18 PM

views 10

भारत आणि न्यूझीलंडमध्ये परदेश व्यापार करारावर वाटाघाटी सुरु

भारत आणि न्यूझीलंड परस्परांबरोबरचे संबंध वरच्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. भारत आणि न्यूझीलंड मध्ये सध्या परदेश व्यापार करारावर वाटाघाटी सुरु आहेत. गोयल यांनी आज न्यूझीलंडचे वाणिज्यमंत्री टॉड मॅकक्ले आणि मध्यस्थांबरोबर न्यूझीलंडमध्ये रोटोरुआ इथं  त्याचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते.    दोन्ही बाजू परस्परांच्या संवेदनशीलतेचा आदर करून भविष्यासाठी सज्ज होत असून, संतुलित व्यापार करारावर काम करत आहेत, तसंच आर्थिक सं...

October 8, 2025 1:42 PM

views 20

मंत्री पियूष गोयल यांच्या कतार दौऱ्यात द्विपक्षीय आर्थिक भागीदारी आणि व्यापारावर चर्चा

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी काल कतारचा तीन दिवसांचा दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात द्विपक्षीय आर्थिक भागीदारी आणि व्यापारावर चर्चा झाली. या भेटीत गोयल यांनी कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांच्या विविध पैलूंचा आढावा घेतला. तसंच, २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं आणि मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न क...

September 21, 2025 3:08 PM

views 40

उद्योग मंत्री पियुष गोयल अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार

अमेरिका - भारत व्यापार करारावरील चर्चेला गती देण्यासाठी भारताचं शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उभय देशातील परस्पर फायदेशीर व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या उद्देशानं चर्चा पुढे नेण्याची या शिष्टमंडळाची योजना असल्याचं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. याआधी १६सप्टेंबरला भारतात आलेल्या अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं या व्यापार कराराच्या विविध पैलूंवर सकारात्मक चर्चा केली असून या...

September 17, 2025 8:03 PM

views 21

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती – मंत्री पियुष गोयल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती झाली आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासारख्या निर्णायक नेतृत्वाची देशाला गरज असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले. भाजपच्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे देशभर ‘सेवा पंधरवडा’ उपक्रम राबण्यात येत असून येत्या २ ऑक्टोबर पर्यंत चालणार्‍या या मोहिमेअंतर्गत रक्तदान शिबिरं, स्वच्छत...

August 16, 2025 8:23 PM

views 14

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ४७ टक्के वाढ

भारतातून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ४७ टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. ही वाढ गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीतली असून मेक इन इंडिया कार्यक्रमाची ही सफलता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. २०१४-१५ यावर्षात इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्यात ३१ अब्ज डॉलर्स होती. ती यंदा १३३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. 

August 2, 2025 8:34 PM

views 12

भारतावर २५ टक्के आयातशुल्क लागू करण्यासंदर्भात मंत्री गोयल यांची उद्योजकांशी चर्चा

भारतावर २५ टक्के आयातशुल्क लागू करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल  यांनी आज मुंबईत काही प्रमुख उद्योजकांशी चर्चा केली. जागतिक स्पर्धा, स्थैर्य, नवोन्मेष आणि मूल्य साखळीला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. भारताला वस्त्रोद्योग क्षेत्रातलं सत्ताकेंद्र म्हणून उदयाला आणण्याच्या दिशेनं सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं.

July 31, 2025 8:02 PM

views 14

अमेरिकेनं भारतावर लादलेल्या २५% आयात शुल्काबाबत मंत्री पीयूष गोयल यांचं निवेदन

अमेरिकेनं भारतावर लादलेल्या  २५ टक्के आयात शुल्काबाबत वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत निवेदन केलं. अमेरिकेनं भारताच्या निर्यातीवर केलेल्या शुल्कवाढीच्या परिणामांची तपासणी सरकार करत असून देशाचं हित जपण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील, असं त्यांनी सांगितलं. याविषयी शेतकरी, उद्योजक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग संस्थांशी चर्चा केली जाईल, असंही गोयल म्हणाले.  अमेरिका आणि भारत यांच्यात समतोल, दोघांनाही फायदा होईल असा व्यापार करार करण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून दोन्ही देशात चर्चा सुरू आहे...

July 20, 2025 6:50 PM

views 27

मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबईतल्या कार्यालयात जनता दरबाराचं आयोजन

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबईतल्या कार्यालयात आज जनता दरबाराचं आयोजन केलं गेलं. यावेळी गोयल यांनी नागरिकांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी नागरिकांनी महानगरपालिका, गृहनिर्माण संस्था, पोलीस विभागांशी संबंधित आपल्या तक्रारी मांडल्या. तातडीनं या समस्या सोडवाव्यात असे निर्देश गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना  यावेळी दिले.