January 1, 2025 9:44 AM January 1, 2025 9:44 AM
30
आगामी दहा वर्षांत अंतराळ संबंधित अर्थव्यवस्थेत पाचपट वाढ होईल असा अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांचा विश्वास
आगामी दहा वर्षांत अंतरिक्षाशी संबंधित अर्थव्यवस्थेत पाचपट वाढ होऊन ती44 अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल असं अणुउर्जा आणि अंतरिक्ष राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. 2023 मध्ये अंतराळ क्षेत्रातली गुंतवणूक एक हजार कोटी रुपयांवर गेली होती. परकीय चलन गंगाजळी वाढवण्यात अंतराळ क्षेत्राचा वाटा मोलाचा आहे. इतर देशांच्या उपग्रह प्रक्षेपणातून भारताला आतापर्यंत 220 दशलक्ष युरोचं उत्पन्न मिळालं असून त्यातलं 85 टक्के उत्पन्न गेल्या 8 वर्षांमधलं आहे असं जितेंद्र...