May 10, 2025 10:49 AM

views 11

आपत्कालीन परिस्थितीत देशात पुरेसा अन्नसाठा असल्याची कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांची माहिती

देशात पुरेसा अन्नसाठा असल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत शांत राहण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. यंदा भरघोस उत्पादन झालं असून आगामी पिकांसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं.