September 10, 2024 7:57 PM September 10, 2024 7:57 PM
15
विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ – मंत्री नितीन गडकरी
विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून २०३० पर्यंत हा खप वर्षाला एक कोटी पर्यंत पोहोचेल असं केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज सिएम या भारतीय वाहन उत्पादक संघटनेच्या ६४व्या संमेलनात बोलत होते. या उद्योगातून ५ कोटी रोजगार निर्मिती होईल असं ते म्हणाले. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी या संमेलनाला उपस्थित होते.