November 15, 2024 3:24 PM

views 25

काँग्रेसनंच राज्यघटनेची मोडतोड केली – मंत्री नितीन गडकरी

भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात आष्टी इथं प्रचारसभा घेतली. भाजपा राज्यघटना बदलणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेस करीत आहे, पण खरं तर काँग्रेसनंच अनेकदा घटनेची मोडतोड केली, असं ते यावेळी म्हणाले. लोकांना पटवून देता येत नाही म्हणून संभ्रमित करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, अशी टीका त्यां केली. आम्ही घटना बदलणार नाही आणि कोणाला ती बदलूही देणार नाही, असं गडकरी म्हणाले.

November 14, 2024 6:59 PM

views 26

विधानसभा निवडणूक जनतेच्या भवितव्याचा निर्णय करणारी निवडणूक – मंत्री नितीन गडकरी

ही विधानसभा निवडणूक जनतेच्या भवितव्याचा निर्णय करणारी निवडणूक आहे, असं प्रतिपादन भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर मतदारसंघातल्या प्रचारसभेत बोलत होते.    देशातली गरीबी, बेरोजगारी दूर व्हायला हवी, स्मार्ट शहरांप्रमाणेच स्मार्ट खेडी उभारली गेली पाहिजेत, देश पाच ट्रिलिनय अर्थव्यवस्था बनला पाहिजे तरच देश विश्वगुरू होईल, असं गडकरी म्हणाले. महायुतीच्या दहा वर्षात सहा हजार कोटी रुपये धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी दिला, तुळजापूर तीर्थक्षेत...

November 10, 2024 6:24 PM

views 17

काँग्रेसने संविधान बदलण्यात येणार असल्याचा विषारी प्रचार चालवलाय – मंत्री नितीन गडकरी

काँग्रेस ने संविधानाचा सोयीनुसार  वापर केला, अवहेलना केली, आणि आता संविधान बदलण्यात येणार असल्याचा विषारी प्रचार चालवला आहे, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केली आहे. यवतमाळमधे राळेगाव इथं ते प्रचारसभेत बोलत होते. त्यामुळे जातीवादी आणि सांप्रदायिक प्रचारापासून दूर रहावं असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.

October 24, 2024 3:41 PM

views 22

रस्ते सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर – मंत्री नितीन गडकरी

रस्ते सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सरकार करत आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं १२व्या ट्रॅफिक इन्फ्राटेक एक्स्पोला ते संबोधित करत होते. रस्ते बांधणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक आहे हे त्यांनी यावेळी अधोेरेखित केलं. रस्ते बांधणीसाठीच्या आधुनिक पद्धती मांडण्यासाठी सरकार अभियंत्यांना प्रोत्साहन देत आहे, असंही गडकरी म्हणाले.    राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण बांधत असलेल्या...

October 14, 2024 7:58 PM

views 14

इथेनॉल जैवइंधनाचे देशभरात ४०० पंप सुरु – मंत्री नितीन गडकरी

इथेनॉल जैवइंधनाचे देशभरात ४०० पंप सुरु झाले असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने नवी दिल्ली इथं आयोजित जैव इंधन शिखर परिषदेत आज ते बोलत होते.  इथेनॉल आणि गॅस या दोन्ही इंधनावर चालू शकतील अशी वाहनं लौकरच बाजारात आणण्याचा सरकारचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं. कचऱ्याचं व्यवस्थापन करुन त्याचा जैव इंधनासाठी वापर करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. जैवइंधन आर्थिकदृष्ट्याही किफायतशीर असल्याचं त्यांनी सांगितलं.   पेट्रोल...

October 13, 2024 3:29 PM

views 23

वाशिममध्ये वैद्यकीय उपकरणांचा कारखाना सुरू होणार – मंत्री नितीन गडकरी

वाशिम इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं असून त्याला पूरक अशा वैद्यकीय उपकरणांचा कारखाना वाशिम जिल्ह्यात लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज वाशिम इथं तपोनिधी या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या कारखान्यामुळे ३ हजार युवकांना रोजगार मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.

October 3, 2024 11:10 AM

views 19

राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामात ८० लाख टन वर्गीकृत केलेल्या कचऱ्याचा वापर – मंत्री नितीन गडकरी

राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामात ८० लाख टन वर्गीकृत केलेल्या कचऱ्याचा वापर करण्यात आला असल्याचं काल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं सांगितलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यामुळं स्वच्छता अभियानाला हातभार लागत असून, रस्ते बांधताना करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. नागपूर महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील सांडपाणी औष्णिक ...

October 2, 2024 2:20 PM

views 11

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ८० लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ८० लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर करण्यात आला असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपुरात सांगितलं. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महापालिकेतर्फे आयोजित श्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते. नागपूर महानगरपालिकेमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला पुरवलं जातं. पेंच, कोराडी, खापरखेडा या प्रकल्पातल्या राखीव पाण्याचा वापर आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत असल्याची माहितीही गडकरी...

September 21, 2024 7:15 PM

views 22

येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्यात संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरच्या  दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण तसंच वारजे-सिंहगड दरम्यान सेवा रस्ते आणि पुलांच्या बांधकामांचं भूमिपूजन केल्यावर बोलत होते. शेकडो वर्षांचा वारीचा इतिहास असलेल्या आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर या पालखी मार्गाची निर्मिती करण्याची संधी मिळाली, याचा आपल्याला अतिशय आनंद होत असल्याचं ते म्हणाले.  पुणे विमानतळाला...

September 19, 2024 8:12 PM

views 19

हायड्रोजन इंधनाचा वापर करुन इंधन आयातीची प्रमाण २२ लाख कोटी रुपयांवरुन ४ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा मानस

हायड्रोजन इंधनाचा वापर करुन इंधन आयातीची प्रमाण २२ लाख कोटी रुपयांवरुन ४ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा मानस असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज म्हणाले. यासाठी केंद्र सरकार मिराई प्रकल्प राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं. जैव तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वस्त दरात हायड्रोजन उपलब्ध होऊ शकेल. १ डॉलर प्रति किलो दरानं हायड्रोजन निर्मितीचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.