January 9, 2025 8:05 PM January 9, 2025 8:05 PM

views 14

सरकारनं भारताला ऊर्जा निर्यात करणारा देश म्हणून बदललं – मंत्री नितीन गडकरी

सरकारनं देशाला ऊर्जा आयात करणाऱ्या देशाऐवजी ऊर्जा निर्यात करणारा देश म्हणून बदललं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मध्य प्रदेशातल्या पिठमपूर इथल्या राष्ट्रीय वाहन चाचणी केंद्रानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते.    भारत आता पारंपारिक ऊर्जेच्या पर्यायाना सातत्यानं प्रोत्साहन देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, हायड्रोजन हे भविष्यातलं इंधन असून सरकार आणि अनेक वाहन निर्माण कंपन्या त्या दिशेनं प्रयत्न करत असून देशाच्या आर्थिक विकासा...

January 6, 2025 7:49 PM January 6, 2025 7:49 PM

views 13

विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं- नितीन गडकरी

स्वत:साठीच नाही तर इतरांसाठीही रस्ते सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. मुंबईत 'रस्ते सुरक्षा अभियान २०२५'च्या 'सुरक्षा रिलोडेड' कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. दुदैवानं गेल्या वर्षभरात रस्ते अपघातांची संख्या वाढली असून शाळा आणि संस्थात्मक क्षेत्रात १० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचं त्यांनी सांगितलं.

January 5, 2025 8:17 PM January 5, 2025 8:17 PM

views 10

विश्वासार्हता हेच सहकारी संस्थांचे भांडवल – नितीन गडकरी

महाराष्ट्रातली सहकार क्षेत्राची परंपरा मोठी असून देशाला दिशा देण्याची क्षमता या परंपरेत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपुरात मानेवाडा इथं गांधीबाग सहकारी बँकेच्या इमारतीचं उद्घाटन करताना बोलत होते. सहकार क्षेत्रातल्या संस्थांसाठी विश्वासार्हता आणि गुणवत्ता हेच सर्वांत मोठं भांडवल आहे, असं ते म्हणाले.    विदर्भात सहकार क्षेत्रात कर्मचारी आणि संचालकांना उत्तम प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. निर्णयक्षमता, सांघिक कार्य, यांचं प्रशिक्षण दिलं, तर त...

January 3, 2025 6:57 PM January 3, 2025 6:57 PM

views 8

नागपुरात तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

आदिवासी विकास विभागानं नागपूर इथं आयोजित केलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचं आज  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राज्यातल्या नागपूर, नाशिक, ठाणे आणि अमरावती या चार विभागांतल्या शासकीय तसंच अनुदानित आश्रमशाळांमधले १ हजार ९१७ आदिवासी खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये  सहभागी झाले आहेत.

January 3, 2025 3:15 PM January 3, 2025 3:15 PM

views 12

दिल्लीत प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीनं मंत्री नितीन गडकरींची प्रकल्पाची घोषणा

राजधानी दिल्ली परिसरातली वाहतूक खोळंब्याची स्थिती सुधारावी तसंच प्रदूषण कमी व्हावं यादृष्टीनं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका प्रकल्पाची घोषणा केली. सुमारे साडे बारा हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे दिल्ली-कटरा एक्सप्रेसवे तसंच डेहराडून - द्वारका एक्सप्रेसवे हे रस्ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडले जातील. यामुळे अनेक वाहनांना दिल्ली शहरात येण्याची गरज उरणार नाही.

December 19, 2024 6:54 PM December 19, 2024 6:54 PM

views 5

हरीत महामार्ग धोरण २०१५ अनुसार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर काम सुरु-नितीन गडकरी

हरीत महामार्ग धोरण २०१५ अनुसार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर काम सुरु झाल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितलं. राष्ट्रीय महामार्गांवर बासष्ठ हजार किलोमीटरपेक्षाही अधिक पट्ट्यावर रोपं लावण्याचं काम सुरु झालं आहे. या प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.  यामुळे स्त्रिया, स्वयंसेवी संस्था अशा परिघावरच्या  ग्रामीण समुदायाला लाभ होईल आणि सामाजिक आर्थिक उन्नतीच्या दिशेने त्यांची व...

December 14, 2024 9:55 AM December 14, 2024 9:55 AM

views 7

दिल्ली-डेहराडून द्रुत-गती मार्गाच्या पूर्ण झालेल्या टप्प्याचं पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन होणार – मंत्री नितीन गडकरी

दिल्ली-डेहराडून द्रुत-गती मार्गाच्या पूर्ण झालेल्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 15 ते 20 दिवसांत उद्घाटन होणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या द्रुतगती महामार्गामुळे दिल्ली डेहराडून या दोन्ही शहरांमधील अंतर अडीच तासांपर्यंत कमी होण्यासाठी मदत होईल असं गडकरी यांनी सांगितलं.

December 7, 2024 5:16 PM December 7, 2024 5:16 PM

views 5

देशातला इलेक्ट्रिक वाहन उद्योग २०३० पर्यंत सुमारे ४ कोटी रोजगार निर्माण करणारं क्षेत्र बनेल-नितीन गडकरी

देशातला इलेक्ट्रिक वाहन उद्योग २०३० पर्यंत सुमारे ४ कोटी रोजगार निर्माण करणारं क्षेत्र बनेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज नागपूरमध्ये राष्ट्रीय अग्निशमन  महाविद्यालयात 'इलेक्ट्रिक वाहनातल्या आगीच्या दुर्घटनांचं व्यवस्थापन'  या विषयावरच्या कार्यशाळेत बोलत होते. इलेक्ट्रिक दुचाकींना लागणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी डीआरडीओ आणि आयआयटीमधल्या तज्ञांच्या समितीनं संशोधन केलं असून एआयएस या सुरक्षा मानांकनानं  बॅटरी सुरक्षा सुनिश्चित केली असल्याचं त...

November 18, 2024 7:23 PM November 18, 2024 7:23 PM

views 13

सबका साथ, सबका विकास हेच आपलं ध्येय – नितीन गडकरी

आपल्या सरकारने नागपूरचा सर्वांगिण विकास करण्यासाठी केला असून सबका साथ, सबका विकास हेच आपलं ध्येय आहे, असं प्रतिपादन भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नागपूर इथं आयोजित सांगता सभेत ते बोलत होते.  काँग्रेसकडे साठ वर्षे सत्ता असूनही नागपूरचा विकास झाला नाही, मात्र भाजपा सरकारच्या दहा वर्षांच्या काळात शहराचा चेहरामोहरा बदलला असं गडकरी यांनी सांगितलं.

November 15, 2024 3:24 PM November 15, 2024 3:24 PM

views 13

काँग्रेसनंच राज्यघटनेची मोडतोड केली – मंत्री नितीन गडकरी

भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात आष्टी इथं प्रचारसभा घेतली. भाजपा राज्यघटना बदलणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेस करीत आहे, पण खरं तर काँग्रेसनंच अनेकदा घटनेची मोडतोड केली, असं ते यावेळी म्हणाले. लोकांना पटवून देता येत नाही म्हणून संभ्रमित करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, अशी टीका त्यां केली. आम्ही घटना बदलणार नाही आणि कोणाला ती बदलूही देणार नाही, असं गडकरी म्हणाले.