November 22, 2025 7:27 PM November 22, 2025 7:27 PM

views 17

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीचं आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं भवितव्य बदलू शकतं – मंत्री नितीन गडकरी

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीचं आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं भवितव्य बदलू शकतं, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसंच ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केलं. 'संत्रा: स्पेन, इस्रायल व्हाया विदर्भ' या पुस्तकाचं प्रकाशन आज गडकरी यांच्या हस्ते नागपूर इथं झालं, त्यावेळी बातमीदारांशी ते बोलत होते.

October 7, 2025 3:14 PM October 7, 2025 3:14 PM

views 20

विदर्भातल्या ११, मराठवाड्यातल्या ८ जिल्ह्यांमध्ये दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि मदर डेअरीच्या सहकार्यातून विदर्भातल्या ११ आणि मराठवाड्यातल्या ८ जिल्ह्यांमध्ये दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि  महामार्ग मंत्री नितिन गडकरी आणि पर्यावरण आणि  पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.  विदर्भ आणि मराठवाड्यातल्या दुग्धविकास योजनेच्या क्षेत्रात दुधाचं संकलन करणं, दुभत्या जनावरांची संख्या वाढवणं, या माध्यमातून या भागात स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणं आणि  शेतकऱ्य...

August 12, 2025 9:19 AM August 12, 2025 9:19 AM

views 13

अन्नदाता शेतकऱ्यांना उर्जादाता बनवणं ही काळाची गरज – मंत्री नितीन गडकरी

अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना उर्जादाता बनवणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. जागतिक जैवइंधन दिनानिमित्त प्राज इंडस्ट्रीज संस्थेच्यावतीनं पुण्यात बायोव्हर्स उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राज संस्थेचे अध्यक्ष प्रमोद चौधरी उपस्थित होते. जैव इंधन आणि हरित हायड्रोजन उत्पादनाचा वापर वाढला तर भारत ऊर्जा निर्यातदार देश बनेल असा विश्वास व्यक्त करुन गडकरी म्हणाले.

August 3, 2025 6:15 PM August 3, 2025 6:15 PM

views 12

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज या उद्योजक संघटनेच्या विदर्भ विभागीय कार्यालयाचं उद्घाटन

विदर्भातली खनिजसंपत्ती, वन उत्पादनं, कापूस उद्योग या जमेच्या बाजू  विकासाच्या दृष्टीनं लक्षात घेऊन उद्योजकांनी पुढाकार घ्यावा त्याकरता केंद्र आणि राज्यसरकार सर्वतोपरि सहकार्य करेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज या उद्योजक संघटनेच्या विदर्भ विभागीय कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर आज नागपुरात  ते बोलत होते.    रायपूर ते विशाखापट्टणम हा महामार्ग पूर्णत्वास जात असताना गडचिरोली त्याला जोडल्यास आंध्रप्रदेशातली बंदरं वि...

July 8, 2025 3:18 PM July 8, 2025 3:18 PM

views 16

वाहतूक क्षेत्राने पर्यावरणाच्या बाबतीत सर्वाधिक जबाबदारी निभावली – मंत्री नितीन गडकरी

वाहतूक क्षेत्रामुळे देशातल्या प्रदुषणात चाळीस टक्के भर पडते. त्यामुळे या क्षेत्राने पर्यावरणाच्या बाबतीत सर्वाधिक जबाबदारी निभावली पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. फरिदाबाद नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कॉरिडॉरवर एक पेड माँ के नाम या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज झाली त्यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते. भारताचा वाहनउद्योग जपानला मागे टाकून जगात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. वाहन उद्योगाने जवळपास साड...

July 5, 2025 7:29 PM July 5, 2025 7:29 PM

views 19

भंडारा ते नागपूर या रस्त्याच्या सहापदरीकरणाचं काम पुढील चार महिन्यात सुरू होईल – मंत्री नितिन गडकरी

भंडारा ते नागपूर या रस्त्याच्या सहापदरीकरणाचं काम पुढील चार महिन्यात सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज भंडारा इथं केली. राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील भंडारा बायपास तसंच मौदा वाय जंक्शन इथल्या सहा पदरी उड्डाणपुलाचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.  

June 27, 2025 4:14 PM June 27, 2025 4:14 PM

views 15

भविष्यातला माणूस घडविण्यासाठी जे आवश्यक आहे, त्यानुसार शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट्य निश्चित करण्याची गरज आहे – मंत्री नितीन गडकरी

भविष्यातला माणूस घडविण्यासाठी जे आवश्यक आहे, त्यानुसार शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट्य निश्चित करण्याची गरज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपुरात मंथनच्या वतीनं आयोजित शिक्षक परिसंवादात बोलत होते. जगात समाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. आपल्याला विश्वगुरू व्हायचं आहे, जगातली तिसरी अर्थव्यवस्था व्हायचं आहे आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करायचा आहे, असं प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे. विश्वगुरू म्हणून मान्यता फक्त आर्थि...

June 27, 2025 11:16 AM June 27, 2025 11:16 AM

views 10

दुचाकी वाहनांची संपूर्ण पथकर मुक्ती सुरू राहील-मंत्री नितीन गडकरी

दुचाकी वाहनांची संपूर्ण पथकर मुक्ती सुरू राहील, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. दुचाकींवर पथकर लादण्यात येणार असल्याचा कोणताही निर्णय प्रस्तावित नसून काही प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात प्रसारित केलेलं वृत्त दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी सांगितलं.  

June 27, 2025 9:50 AM June 27, 2025 9:50 AM

views 24

आणीबाणी हा देशाच्या इतिहासातील एक काळा काळ होता – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' हे शब्द आणीबाणीच्या काळात समाविष्ट करण्यात आले होते; ते कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा भाग नव्हते, असं सांगत, याबाबत फेरविचार करावा असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे यांनी केलं आहे. आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काल नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणीबाणी हा देशाच्या इतिहासातील एक काळा काळ हो...

June 17, 2025 2:38 PM June 17, 2025 2:38 PM

views 21

दुर्गम आणि आदिवासी भागात २००० वाहन चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार

केंद्र सरकारनं देशाच्या विविध भागात दोन हजार वाहन चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही माहिती दिली. देशाच्या दुर्गम आणि आदिवासी भागात ही प्रशिक्षण केंद्र सुरू  करण्यात  येतील, यामुळे तरुणांना आणखी एक कौशल्य आत्मसात करता येईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं गडकरी म्हणाले.  देशात सध्या सुमारे २२ लाख  वाहन  चालकांची आवश्यकता आहे; आणि या प्रशिक्षण केंद्रांमधून कुशल वाहन चालक तयार...