October 25, 2025 8:09 PM October 25, 2025 8:09 PM
145
AI चा वापर करणारा सिंधुदुर्ग देशातला पहिला जिल्हा
प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करणारा देशातला पहिला जिल्हा ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी नीती आयोगाचं एक पथक ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गात येत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आज ओरोस इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निती आयोगाचं पथक या दौऱ्यात आरोग्य, शिक्षण, संरक्षण आणि कृषी विभागात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने सुरु असलेल्या कामांचा अभ्यास करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून क...