April 22, 2025 1:13 PM

views 16

अमेरिका आणि भारत देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्ण होण्याची आशा -अर्थमंत्री

अमेरिकेच्या नव्या प्रशासनाशी भारत सक्रीय संवाद साधत असून पुढील पाच ते सहा महिन्यात दोन्ही देशांदरम्यान द्वीपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा सकारात्मक दृष्टीने पूर्ण करण्याची आशा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या पाच दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्या विविध अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरू करायला सहमती...

February 27, 2025 1:19 PM

views 20

जागतिक आव्हानं पेलत भारतीय अर्थव्यवस्था विकासमार्गक्रमणा करत असल्याचं अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

जागतिक पातळीवरची आव्हानं पेलत भारतीय अर्थव्यवस्था विकासमार्गक्रमणा करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित माध्यमांशी संवाद कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या. सध्याच्या काळात जागतिक पुरवठा साखळीत अडथळे उद्भवण्याचा धोका असून आता जगाचं भविष्य केवळ विकसित देशांच्या हाती राहिलेलं नाही, असं त्या म्हणाल्या. नवीन जग व्यापार आणि तंत्रज्ञानातून आकाराला येत असून भारताला त्यादृष्टीने धोरणं आखावी लागतील असं मत त्यांनी व्यक्त केलं. येत्या काळात वाढत्या मध्यमवर्गाच...