December 12, 2024 8:26 PM December 12, 2024 8:26 PM

views 6

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजूजू यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचा हक्कभंग ठराव

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजूजू यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य सागरिका घोष यांनी आज राज्यसभेत हक्कभंग ठराव मांडला. त्या म्हणाल्या की, संसदेच अधिवेशन विनाअडथळा चालवण्याची जबाबदारी संसदीय कामकाज मंत्र्यांवर असते. त्याऐवजी त्यांनी विरोधी सदस्यांचा अपमान केला. त्यांची विधानं आक्षेपार्ह असून ती कामकाजातून काढून टाकावीत, आणि रिजूजू यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.