November 27, 2024 8:32 PM November 27, 2024 8:32 PM

views 7

वक्फ बोर्डासंबधीच्या संयुक्त संसदीय समिती वक्फ बोर्ड कायद्याचा मसूदा येत्या २९ तारखेला पटलावर मांडण्याची शक्यता

वक्फ बोर्डासंबधीच्या संयुक्त संसदीय समिती वक्फ बोर्ड कायद्याचा मसूदा येत्या २९ तारखेला पटलावर मांडण्याची शक्यता आहे, परंतू या समितीनं अनेक राज्यांमधल्या बोर्डाच्या हरकती ऐकून घेतलेल्या नाहीत त्यामुळे समितीची मुदत वाढवावी अशी मागणी या समितीचे सदस्य असलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारानी केली आहे. समितीनं बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांचा दौरे केले नाहीत, तसंच दिल्ली, जम्मू काश्मीर, पंजाब आणि उत्तर प्रदेश सरकारची बाजू ऐकलेली नाही असं विरोधी पक्षांच्या सदस्यांनी म्हटलं आहे. समितीने एकूणच कामकाज गंभीरप...

October 14, 2024 8:10 PM October 14, 2024 8:10 PM

views 7

‘भगवान गौतम बुद्धांचा विचार तळागाळात पोहोचवून परिवर्तन करण्याची ताकद भिक्खु संघात आहे’

भगवान गौतम बुद्धांचा विचार तळागाळात पोहोचवून परिवर्तन करण्याची ताकद भिक्खु संघात आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजु यांनी केलं. मुंबईत समता परिषदेने भिक्खु संघासाठी आयोजित केलेल्या भोजनदान, चिवरदान कार्यक्रमात रिजिजु सहभागी झाले होते, त्यांनी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्लक्षित झालेल्या स्थळांचा विकास केला जाईल, असं रिजिजु म्हणाले. या कार्यक्रमाला ऑल इंडिया भिक्खु संघाचे अध्यक्ष भदंत राहुल बोधी, भाजपचे संघटन मंत्री व्ही. सतीश, अशो...

October 14, 2024 10:00 AM October 14, 2024 10:00 AM

views 12

26 नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबविण्यात येणार

26 नोव्हेंबर रोजी संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली.   ते काल महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन उभारण्यात येणार असल्याचं रिजीजू म्हणाले. संविधानात बदल करण्यात येणार असा अपप्रचार काही घटकांकडून होत आहे, या अपप्रचाराला बळी पडू नका, असं आवाहनही रिजीजू या...

October 7, 2024 7:39 PM October 7, 2024 7:39 PM

views 9

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारण्यात येणार असल्याची मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा

आगामी काळात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली. विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहे. नागरिकांच्या मनातील हा संभ्रम दूर व्हावा, याकरता संविधान भवनाच्या माध्यमातून वास्तव स्थितीची माहिती करून देण्यात येईल असं रिजिजू म्हणाले. महाराष्ट्रातल्या बौद्ध विहारांचा विकास करण्यात येईल असंही रिजिजू म्हणाले.

October 7, 2024 10:54 AM October 7, 2024 10:54 AM

views 14

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य भारताचा वेगाने विकास- किरेन रिजीजू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य भारत  विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याचं प्रतिपादन संसदीय व्यवहार आणि अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजीजू यांनी केलं आहे.   काल एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना, रिजीजू यांनी मणिपूरमधील काही घटना वगळता संपूर्ण ईशान्य भारतात शांतता असल्याचं रिजीजू म्हणाले. काँग्रेसनं ईशान्य भागाच्या विकासासाठी ठोस काम केलं नसल्याचा आरोप करत, केंद्रात मोदींची सत्ता आल्यापासून दहा हजारांहून अधिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असल्याचंही रिजीजू या...

October 4, 2024 5:28 PM October 4, 2024 5:28 PM

views 12

महाराष्ट्रातली बौद्ध धर्माशी संबंधित तीर्थस्थळांचा विकास करण्यात येणार – किरेन रिजिजू

महाराष्ट्रातली बौद्ध धर्माशी संबंधित तीर्थस्थळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळं तसंच स्मारकं यांचा विकास करण्यात येणार असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितलं. नागपूरमधे पवित्र दीक्षाभूमीचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.   या कामासाठी संबंधित सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था या सर्वांसोबत समन्वय साधण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. किरेन रिजीजू आज प्रदेश भाजपा कार्यालयातर्फे आयोजित बैठकीत सहभागी होणार असून, अनुसूचित जाती मोर्चाच्या ...

September 25, 2024 3:16 PM September 25, 2024 3:16 PM

views 18

वक्फ सुधारणा विधेयकाचं पुनरावलोकन करण्यासाठीचा अहवाल हिवाळी अधिवेशनात सादर होणार

वक्फ सुधारणा विधेयकाचं पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन झालेली संसदेची संयुक्त समिती आपला अहवाल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सादर करेल, अशी अपेक्षा केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री किरेन रिजुजु यांनी व्यक्त केली. समितीला एक कोटीपेक्षा जास्त निवेदनं प्राप्त झाली असंही रिजुजु यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला शंभर दिवस पूूर्ण झाल्याबद्दल रिजुजु दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. संयुक्त समिती विविध सरकारी आणि खासगी संस्थांकडून सूचना मागवत असून यावर व्यापक चर्चा सुरू असल्याचं ...

September 14, 2024 3:00 PM September 14, 2024 3:00 PM

views 21

वक्फ सुधारणा विधेयकाला मुस्लिम बांधवांचं समर्थन असल्याचं मंत्री किरेन रिजिजू यांचा दावा

वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल कुणाच्याही मनात कोणताही संभ्रम असण्याची गरज नाही. काही लोक या विधेयकाला विरोध करत असले, तरी बहुतेक मुस्लिम बांधवांनी या विधेयकाला समर्थन दिलं आहे, असा दावा केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. मुंबईत पारसी समुदायाच्या कार्यक्रमानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. देशात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मात्र या विधेयकाबद्दल खोट्या गोष्टी पसरवून कुणीही नागरिकांची दिशाभूल करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

September 14, 2024 3:59 PM September 14, 2024 3:59 PM

views 7

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाला सर्व प्रकारची मदत दिली जाईल – मंत्री किरेन रिजिजु

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला सर्व प्रकारची मदत दिली जाईल, कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पारसी समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार आणि इतर यावेळी उपस्थित होते.   पारसी समाजाची घसरती लोकसंख्या हे या समुदायासमोरचं सर्वात मोठं आव्हान असून त्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार ‘जियो पारसी...

September 14, 2024 1:38 PM September 14, 2024 1:38 PM

views 6

बुद्ध धर्माला योग्य रीतीनं पुढे नेण्याचा सरकारचा प्रयत्न – किरेन रिजिजू

बुद्ध धर्माला योग्य रीतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केला आहे, असं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितलं. ते आज मुंबईत ‘भगवान बुद्ध यांच्या मध्यम मार्गाद्वारे भविष्यातील जागतिक नेतृत्वासाठी मार्गदर्शन’ या विषयावर आयोजित एक दिवसीय संमेलनात बोलत होते.   भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चाललं तर जगाचं नेतृत्व करणं सोपं होईल, आजकाल निव्वळ मतं मिळवण्यासाठी राजकारण केलं जातं , मात्र हे चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुद्धाची शि...