July 4, 2025 6:58 PM July 4, 2025 6:58 PM

views 11

केंद्र सरकार २०२६ च्या हज यात्रेसाठीची अर्ज प्रक्रिया येत्या आठवडाभरात सुरू करणार

केंद्र सरकार २०२६च्या हज यात्रेसाठीची अर्ज प्रक्रिया येत्या आठवडाभराच्या आत सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. रिजिजू यांनी आज नवी दिल्ली इथं हज यात्रेविषयी आढावा बैठक घेतली, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते.  सर्व अर्जदारांना वेळेत अर्ज भरावेत असं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या हज समितीला सौदी अरेबिया सरकारकडे निर्धारित मुदतीपूर्वी पैसे जमा करण्याचे निर्देश दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली. आगामी हज यात्रेसाठी ६५ वर्षांपेक्षा जास्त वय...

June 12, 2025 2:28 PM June 12, 2025 2:28 PM

views 13

किरेन रिजिजु यांच्या उपस्थितीत लोक संवर्धन पर्व कार्यक्रमाचं उद्घाटन

लोक संवर्धन पर्व कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय अल्पसंख्यक कार्यमंत्री किरेन रिजिजु यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीमधल्या राजघाट इथं झालं.  या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजना, कार्यक्रम आणि कामगिरीची माहिती सादर केली जाईल. सरकारने अल्पसंख्यक समुदाय विशेषतः कारागिरांच्या आर्थिक उत्थानासाठी केलेल्या प्रयत्नांविषयीही या कार्यक्रमातून माहिती दिली जाईल.   खेड्यातल्या कारागिरांकडे मोठं कसब असून त्यांच्या हस्तनिर्मित वस्तू बाजारात याव्यात यासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात आल्याचं अल्पसंख...

May 6, 2025 8:07 PM May 6, 2025 8:07 PM

views 17

व्हिएतनाममध्ये वेसाक दिनानिमित्त मंत्री किरेन रिजिजू यांचं संबोधन

संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज व्हिएतनाम मधल्या हो ची मिन्ह शहरात संयुक्त राष्ट्र वेसाक दिनाच्या उद्घाटन समारंभाला संबोधित केलं. भगवान बुद्धांची कालातीत शिकवण वर्तमानातली अनेक जागतिक आव्हानं आणि समस्यांवर उपाय सुचवणारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.    त्यानंतर, रिजिजू यांनी व्हिएतनामचे राष्ट्रपती लुओंग कुओंग यांचीही भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशातली व्यापक धोरणात्मक भागिदारी आणखी मजबूत करण्यावर भर दिला. 

March 31, 2025 8:24 PM March 31, 2025 8:24 PM

views 14

संसदेत वफ्क सुधारणा विधेयकवरच्या चर्चेत सहभाग घेण्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांचं आवाहन

वफ्क सुधारणा विधेयक संसदेत सादर झाल्यावर त्यावरच्या चर्चेत सहभाग घेण्याचं आवाहन केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री किरेन रिजीजू यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं आहे. नवीदिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या विधेयकाविषयी काही राजकीय नेते अफवा पसरवत आहेत. नागरिकांची दिशाभूल करण्याचे हे प्रयत्न निंदनीय असल्याचं ते म्हणाले. संयुक्त संसदीय समितीत या विधेयकावर सविस्तर चर्चा झाली आहे. या समितीनं विविध संघटना आणि नागरिकांची या विधेयकाबद्दलची प्रतिक्रिया जाणून घेतल्याचं रिजीजू यांनी सांगितलं. 

March 25, 2025 7:56 PM March 25, 2025 7:56 PM

views 15

भारताला आत्मनिर्भर देश बनवण्याच्या प्रक्रियेत अल्पसंख्यांकांचं महत्त्वाचं योगदान – मंत्री किरेन रिजिजू

भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर देश बनवण्याच्या प्रक्रियेत अल्पसंख्याक समुदायाचं योगदान महत्त्वाचं असणार आहे असं, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत झालेल्या राज्य अल्पसंख्याक आयोगांच्या परिषदेत बोलत होते.    अल्पसंख्याक समुदायात शिक्षण आणि कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी यावेळी अधोरेखित केली. केंद्र सरकार मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी या सहा अधिसूचित समुदायांच्या कल्याणासाठी अनेक समर्पित योजना राबवत असल्याचं त...

March 22, 2025 6:05 PM March 22, 2025 6:05 PM

views 11

संसदीय कामकाज मंत्रालय आणि दिल्ली सरकार यांच्याबरोबर सामंज्यस्य करार

दिल्ली विधानसभेनं NeVA अर्थात राष्ट्रीय ई-विधान प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी संसदीय कामकाज मंत्रालय आणि दिल्ली सरकार यांच्याबरोबर सामंज्यस्य करार केला आहे. डिजिटल प्रशासनच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी हे एक महत्वपूर्ण पाऊल असून राष्ट्रीय ई-विधान प्रणाली मध्ये  सामील होणारं दिल्ली, हे  २८ वं  विधिमंडळ आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं या सामंज्यस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.    कायदेविषयक कामकाज करणं, सूच...

January 13, 2025 8:53 PM January 13, 2025 8:53 PM

views 18

देशातल्या पावणे २ लाख नागरिकांना हज यात्रेला जाण्याची संधी मिळणार

यंदाच्या हज यात्रेकरता भारतातून पावणेदोनलाख जणांना जाता येईल. केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी  समाजमाध्यमावर ही माहिती दिली. हज यात्रेसाठी भारतीयांचा कोटा एक लाख ७५ हजार २५ असा निश्चित करणाऱ्या  करारावर रिजिजू आणि सौदी अरेबियाचे हाज आणि उमरा विभागाचे मंत्री एच ई तौफीक़ बिन फौझान अल- राबिया यांच्या उपस्थितीत आज स्वाक्षऱ्या झाल्या.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हज यात्रा सुखकर व्हावी याकरता शक्य त्या सर्व सेवा सुविधा द्यायला सरकार वचनबद्ध ...

December 17, 2024 12:16 PM December 17, 2024 12:16 PM

views 10

‘एक देश एक निवडणूक’ हा देशासाठी महत्त्वाचा मुद्दा – मंत्री किरेन रिजीजू

एक देश एक निवडणूक हा देशासाठी एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथे आज ते वार्ताहरांशी बोलत होते. हा मुद्दा कोणत्याही पक्षासाठी किंवा कोणत्याही व्यक्तिसाठी नसून तो देशाच्या हितासाठी आहे. देशात निवडणुका या देश आणि त्या देशाच्या नागरिकांच्या हितासाठी घेतल्या जातात, असंही रिजीजू यावेळी म्हणाले. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जवळपास २० वर्षं देशात एकाच वेळी निवडणुका झाल्या. मात्र काँग्रेसने कलम ३५६चा गैरवापर केल्यामुळे संसद आणि राज्य विधा...

December 9, 2024 1:29 PM December 9, 2024 1:29 PM

views 15

देशविरोधी शक्तींचा एकजुटीनं सामना करण्याचं मंत्री किरेन रिजिजू यांचं आवाहन

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज देशविरोधी शक्तींचा एकजुटीनं सामना करण्याचं आवाहन काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना केलं. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रत्येक मुद्दा राजकीय भिंगातून बघितला जाऊ नये, असं ते म्हणाले. जॉर्ज सोरोस फाऊंडेशन आणि एका ज्येष्ठ  विरोधी नेत्याचे संबंध असल्याचं सार्वजनिक माध्यमातल्या अहवालावरून स्पष्ट होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

November 30, 2024 2:44 PM November 30, 2024 2:44 PM

views 10

मध्य प्रदेशात सांची इथल्या ‘महान स्तूप’ या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर महाबोधी महोत्सव सुरू

मध्य प्रदेशातल्या सांची इथल्या ‘महान स्तूप’ या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर आजपासून दोन दिवसीय महाबोधी महोत्सव सुरू होत आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आज संध्याकाळी जंबुद्वीप पार्क इथं आयोजित या महोत्सवाचं उदघाटन करतील. भगवान बुद्धांचे दोन प्रमुख शिष्य सारीपुत्र आणि मौदगल्यायन यांच्या अस्थींचं पूजन रिजिजू करतील.