November 16, 2024 5:41 PM November 16, 2024 5:41 PM

views 13

राहुल गांधी विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर संसदेत चर्चेचा आणि संवादाचा स्तर खाली गेल्याचा भाजपाचे नेते किरण रिजिजू यांचा आरोप

राहुल गांधी विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर संसदेत चर्चेचा आणि संवादाचा स्तर खाली गेल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि भाजपाचे नेते किरण रिजिजू यांनी केला. ते आज नागपूरात भाजपा कार्यालयात वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्या काँग्रेसनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला इतका विलंब केला आणि आणीबाणीच्या माध्यमातून संविधानाचा अपमान केला अशा काँग्रेसला संविधान, दलित, आदिवासी उच्चारण्याचा अधिकार नाही, असंही ते म्हणाले. या हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा विधेयक पारित करून गरीब मुस्लमा...

October 13, 2024 7:19 PM October 13, 2024 7:19 PM

views 9

प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार – मंत्री किरेन रिजीजू

भारतीय संविधानाला  येत्या २६ नोव्हेंबर रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, या निमित्ताने केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. संविधानात बदल करण्यात येणार असा अपप्रचार काही घटकांकडून होत आहे, या अपप्रचाराला बळी पडू नका, असं आवाहन रिजीजू यांनी केलं.