November 6, 2025 7:19 PM November 6, 2025 7:19 PM

views 13

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते सजिथ प्रेमदासा यांची भेट

केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते सजिथ प्रेमदासा यांची भेट घेतली. या बैठकीत नड्डा यांनी प्रेमदासा यांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत कसं काम करतात याबद्दल आणि भारताच्या विकास प्रवासाला आकार देणाऱ्या ‘लोक-सर्वप्रथम’ या धोरणाबद्दल  माहिती दिली.    राजकीय पक्ष नागरिकांना अधिक चांगली सेवा कशी देऊ शकतील, यावर यावेळी चर्चा झाली. राजकीय पक्ष नागरिकांची सेवा कशी चांगल्या प्रकारे करू शकतात यावर चर्चा झाली. पक्ष आणि सरकारमधल्या समन्वया...

March 11, 2025 8:23 PM March 11, 2025 8:23 PM

views 5

येत्या तीन वर्षांत केंद्र सरकार देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात डे केअर कॅन्सर सेंटर उभारणार

येत्या तीन वर्षांत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात डे केअर कॅन्सर सेंटर उघडण्यात येतील, अशी माहिती आज राज्यसभेत केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. पुढच्या आर्थिक वर्षात दोनशे डे केअर कॅन्सर सेंटर उघडली जातील, असंही नड्डा म्हणाले.     देशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत जिथं निर्देश आणि नियमांचं उल्लंघन होईल, तिथं पथकं पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल, असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत प्रश्न...

March 4, 2025 7:50 PM March 4, 2025 7:50 PM

views 12

केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य संचालन गटाची बैठक

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आरोग्य संचालन गटाची नववी बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य व्यवस्थेतल्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आणि त्यांचं अधिक सक्षमीकरण करण्यावर भर दिला.

February 21, 2025 2:30 PM February 21, 2025 2:30 PM

views 11

गेल्या १० वर्षांत देशातल्या नागरिकांचा आरोग्यखर्च ६४% वरून ३९% टक्क्यांवर

देशातल्या नागरिकांचा आरोग्यविषयक खर्च गेल्या दहा वर्षांत ६४ टक्क्यांवरून ३९ टक्क्यापर्यंत खाली आला असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय आरोग्य संवाद २०२५ या उपक्रमाच्या १२ व्या पर्वाला संबोधित करत होते.   केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि इतर योजनांअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांमुळे ही घट झाली असल्याचं ते म्हणाले. सद्यस्थितीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत देशातल्या ...

January 15, 2025 8:33 PM January 15, 2025 8:33 PM

views 8

देशाला दुबळं करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शक्तींना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा इतिहास – मंत्री जगतप्रकाश नड्डा

देशाला दुबळं करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शक्तींना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी आज केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर ते बोलत होते. काँग्रेसनं सत्तालालसेपोटी देशाच्या एकात्मतेशी तडजोड केली आणि लोकांचा विश्वासघात केला असंही नड्डा म्हणाले. भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर कडक टीका केली.