March 26, 2025 1:30 PM March 26, 2025 1:30 PM

views 3

अन्नपदार्थांमध्ये भेसळीबाबतच्या तक्रारींबाबत सरकारची कारवाई – मंत्री प्रल्हाद जोशी

अन्नपदार्थांमध्ये भेसळीबाबतच्या तक्रारींबाबत सरकार तातडीनं कडक कारवाई करत असल्याची ग्वाही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात दिली. अशा तक्रारी दाखल होताच त्याची चौकशी करून हे अन्नपदार्थ खाण्यायोग्य नसल्याचं आढळल्यास संबंधितांवर सरकार फौजदारी कारवाई करत असल्याचं जोशी यांनी नमूद केलं.   विविध अन्नपदार्थांच्या चाचणीसाठी देशभरात एफ एस एस ए आयच्या २४२ प्रयोगशाळा तसंच चालत्या प्रयोगशाळाही कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. भेसळयुक्त अन्नपदार्था...