March 26, 2025 1:40 PM March 26, 2025 1:40 PM
4
सुरक्षितता ही देशाच्या अणुऊर्जा धोरणाची गुरुकिल्ली – मंत्री जितेंद्र सिंह
सुरक्षितता ही देशाच्या अणुऊर्जा धोरणाची गुरुकिल्ली असून मोदी सरकार, ‘प्रथम सुरक्षितता आणि त्यानंतर उत्पादन’ या नियमाचं पालन करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत केलं. सरकारनं २०३१-३२ पर्यंत सध्याच्या आठ हजार १८० मेगावॅटवरून २२ हजार ४८० मेगावॅट पर्यंत अणुऊर्जा क्षमता वाढवण्यासाठी पावलं उचलली असल्याचं सिंह यांनी प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना सांगितलं. देशातले अणुऊर्जा प्रकल्प कठोर सुरक्षा प्रोटोकॉल आणि आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली चालतात तसंच दीर्घकालीन ऊर्जा ...