February 23, 2025 6:53 PM February 23, 2025 6:53 PM

views 4

बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषद उद्या पुण्यात

राज्यातल्या बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी उद्या पुण्यात बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन केल्याची माहिती पणन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिली. या परिषदेत राज्यातल्या सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव सहभागी होणार आहेत. पुण्याच्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळानं ही परिषद बाणेरमधल्या बंटारा भवन इथं आयोजित केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. कृषी मंत...

January 28, 2025 7:16 PM January 28, 2025 7:16 PM

views 4

मलेशियानं महाराष्ट्रातली उत्पादनं आयात करण्यासाठी पुढाकार घ्यावा-जयकुमार रावल

महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान सांस्कृतिक समानता असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातले परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचं स्वागत करेल, असं राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसुफ यांनी मंगळवारी रावल यांची सह्याद्री अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.   नाशिकचा कांदा आणि द्राक्षं, कोकणचा हापूस आंबा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, इंद्रायणी तांदूळ, ताजी फळे, भाजीपाला अशा विविध उत्पादनांची निर्यात महाराष्ट्रात...

January 9, 2025 6:58 PM January 9, 2025 6:58 PM

views 6

तृणधान्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पणन विभागाची – मंत्री जयकुमार रावल

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तृणधान्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पणन विभागाची आहे, असं प्रतिपादन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आज पुण्यात केलं. ते आज पुण्यात पणन मंडळाच्या वतीनं आयोजित भरडधान्य महोत्सवाचं उद्घाटन करताना बोलत होते. भरडधान्य जनजागृतीसाठी काढलेल्या दुचाकी फेरीलाही रावल यांनी हिरवा झेंडा दाखवला.    राज्याच्या विविध भागातून भरडधान्य उत्पादक, प्रक्रिया उद्योगामध्ये कार्यरत असणारे बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट अप कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत...